Rahul Gandhi : देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वारकऱ्यांमध्ये तल्लीन होणार..
Rahul Gandhi Joined Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla : काँग्रेसनेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी 14 जुलैला वारीमध्ये सहभागी होणार
पुणे :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla सोहळ्याला देशाचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्ष नेते राहुल गांधी Rahul Gandhi उपस्थिती लावणार आहे. राहुल गांधी 14 जुलैला वारी सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi ही पंढरपूरला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात एक दिवस तरी वारी अनुभवी हा उपक्रम राबविला या वारीमध्ये साहित्यिक विचारवंत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते कलावंत यांचे सहभाग असतो तसेच राजकीय मंडळींचाही मोठ्या प्रमाणावर या वारीमध्ये सहभाग असून, सर्व धर्मीय सर्व जातीय समाजातील लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात. विठुरायाच्या जयघोष आळंदी ते पंढरपूर असा प्रवास केला जातो. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही वारीत पायी चालले तसेच त्यांनी वारीचे स्वागतही केले होते.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभर दौरा केला होता. त्यानंतर लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधीही यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत. राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी होणार असल्यामुळे त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येणार आहे.