Rahul Gandhi Mumbai Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार जाहीर सभा
•”भारत जोडो न्याय यात्रा”, 16 मार्चला समाप्त झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 17 मार्चला मुंबईत सभा
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची गॅरंटी या नावाने पाच आश्वासने दिली. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेला परवानगी मिळाली.ईशान्य भारतातून राहुल गांधी यांची भारत जोडोन्याय यात्रा महाराष्ट्राच्या दिशेने वळली आहे. 10 मार्चरोजी नंदुरबारला पोहोचून महाराष्ट्रात प्रवेश करणारआहे, तर 17 मार्च रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवरसमारोप सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याचसभेतून लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजवण्यातयेणार असून प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. Rahul Gandhi Mumbai Sabha
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो, न्याय यात्रा संपल्यानंतर काँग्रेस मुंबईत ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. या ताकदीच्या प्रदर्शनात इंडिया आघाडीही सहभागी होणार आहे. 16 मार्च रोजी राहुल गांधींची भारत जोडो, न्याय यात्रा मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर 17 मार्च रोजी शिवाजी पार्कवर एक विशाल सभा होणार आहे. या सभेत विरोधी पक्षांचे सर्व प्रमुख नेते आणि मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची योजना आहे.काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेसाठी दिनांक 17 मार्च 2024 करीता छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान उपलब्ध करून देण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूरी देण्यात येत आहे. Rahul Gandhi Mumbai Sabha
राहुल गांधींची 12 मार्चला धुळ्यात सभा होईल. 13 रोजी ते नाशिकला काळाराम मंदिरात दर्शन घेतील. 15 मार्च रोजी भिवंडीत सभा घेऊन 16 मार्च रोजी मुंबईत प्रवेश करणार आहेत. दुपारी 4 वाजता चैत्यभूमी दर्शन घेऊन 17 रोजी सकाळी 10 वाजता ते गांधी पुतळा ते गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहेत. Rahul Gandhi Mumbai Sabha