Uncategorized

Maharashtra BJP Tweet : खासदार संजय राऊत यांच्या मानसिक संतुलन ढासळलेले आहेत ; महाराष्ट्र भाजप

Maharashtra BJP Page Tweet On Sanjay Raut : संजय राऊत यांना नैराश्या आणि ग्रासलेले असून ते रोज काही ना काही बडबड करत असतात अशी टीका महाराष्ट्र भाजप यांच्या अधिकृत पेजवर करण्यात आली आहे.

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut गेल्या काही दिवसांपासून भाजपवर सातत्याने प्रहार करत आहे त्यांच्या या टीकेला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र, यांचे अधिकृत पेजवरून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडला असून ते सातत्याने नैराश्यातून काही ना काही बडबड करत आहे. अशी टीका महाराष्ट्र भाजप यांच्याकडून करण्यात आली आहे. Maharashtra BJP Tweet

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात. अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते.

महाविकास आघाडीचे जागा वाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात. त्यांना धमकावतात. नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचे मन शांत होत नाही. म्हणून मग ते बैठकीत चहा देणाऱ्या वेटरवर खेकसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत.

काल राऊत यांनी प्रकाश जी आंबेडकर यांना ‘ हट्ट करू नका‘ असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे.

आज संजय राऊत यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. पण राऊत हे विसरले आहेत की, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठा मध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा 33 वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी साहेबांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये. Maharashtra BJP Tweet

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0