Priyanka Chaturvedi : जनतेच्या नजरेत…’, ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाला तिकीट मिळाल्याने प्रियंका चतुर्वेदी भाजपवर संतापल्या.

•वादग्रस्त कुस्ती खेळाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांची खासदारकी कापली ठाकरे गटाकडून टीका
मुंबई :- भाजपने यूपीच्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट कापले. त्यांच्या जागी भाजपने त्यांचा मुलगा करणभूषण सिंग यांना गुरुवारी (2 मे) येथून उमेदवारी दिली. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हा निर्णय जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रियंका चतुर्वेदीने सोशल मीडिया X वर लिहिले, वडील ब्रिजभूषण शरण सिंह यांचे मुलाला तिकीट. तुम्ही महिलांना न्याय देण्याचे कसे बोलता? तुम्ही याची टोपी त्याच्या डोक्यावर घालून लोकांची फसवणूक करू शकतात. तुम्ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकता! लज्जास्पद!”
भारताच्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता त्यानंतर देशभरात मोठे आंदोलन पेटले होते. अनेक दिवस ब्रिजभूषण विरोधात कुस्तीपटूंनी आंदोलना केले त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते परंतु पुन्हा त्यांना अध्यक्ष पदर घेतल्याने वादाला तोंड फुटले आणि त्यानंतरही त्यांचे आंदोलन चालूच राहिले होते.