Pune Tadipar News : पुणे पोलिसांची धडक कारवाई.. एकाच दिवशी आठ आरोपींना तडीपार
Pune Police Take Action On Tadipar Criminal : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ -5 क्षेत्रातून आठ जणांवर तडीपारीची कारवाई गुन्हेगारी पार्श्वभूमी
पुणे :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांनी खबरदारी म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना आता तडीपारीचा बडगा उभारला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ 5 क्षेत्रातील एकाच दिवशी आठ आरोपींना Pune Tadipar Criminal पोलीस उप आयुक्त यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या निर्देशानुसार सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपींना तडीपार करण्याचे आदेश दिले आहे. Pune Latest Crime News
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसात वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या आरोपींनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील कोंढवा, वानवडी, मुंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, हडपसर यासह उपनगरांमध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व वाढत चालले आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारी घटनांचा भाग म्हणून परिमंडळ 5 पाहिले जाते. हडपसर पोलीस ठाणे 1, मुंढवा पोलीस ठाणे 4, बिबवेवाडी पोलीस ठाणे 2, मार्केटयार्ड पोलीस ठाणे 1 अशा 8 गुन्हेगारांचा समावेश आहे. Pune Latest Crime News
तडीपार आरोपींची नावे
1.मुंढवा पोलीस ठाण्यातील गुन्हेगार,
- आनंद चिंतामणी गायकवाड (53 वर्ष, रा. आनंद निवास, कामगार मैदान, मुंढवा) – 2 वर्षे.
- •शांताबाई यल्लप्पा कट्टीमणी (52 वर्ष, रा. बालाजीनगर, घोरपडीगाव) 1 वर्षे.
- •अतिश सुरज बाटुंगे/ तामचिकर (25 वर्ष, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) – 2 वर्षे
- •बापू अशोक जाधव (47 वर्ष रा. साडेसतरानळी रोड, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) 6 महिने तडीपार करण्यात आले आहे.
2.मार्केटयार्ड पोलीस ठाणे.
- दिलेर अन्वर खान (34 वर्ष, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) 1 वर्षे.
3.हडपसर पोलीस ठाणे
- रवी मारुती चक्के (30 वर्ष, रा. साडेसतरानळी, दांगट वस्ती, हडपसर) – 2 वर्षे तडीपार करण्यात आले आहे.
4.बिबवेवाडी पोलीस ठाणे
- विजय सिद्धप्पा कटीमणी (रा. झांबरेवस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) 2वर्ष
- कन्या अभिमन्यु राठोड (35 वर्ष, रा. गव्हाणेवस्ती, गंगाधाम रोड, बिबवेवाडी) 1 वर्ष.
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी हे गुन्हेगार तडीपार कालावधीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास
तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस केले आहे.