Pune Police News | स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे पोलिसांची विशेष भेट : चोरीला गेलेले ५३ मोबाइल नागरिकांना केले सुपूर्द
- अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या हस्ते हरवलेले मोबाईल नागरिकांना सुपूर्द
- शिवाजीनगर पोलीस स्टेशन सायबर पथकाची धडाकेबाज कामगिरी
पुणे, दि. १४ ऑगस्ट, (मुबारक जिनेरी) महाराष्ट्र मिरर : Pune Police News
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुणे पोलिसांनी नागरिकांना एक सुखद धक्का दिला आहे. पोलीस विभागाद्वारे (Pune Police) जिल्ह्यातील 5३ मोबाईल धारकांचे मोबाईल शोधून त्यांच्या मुळ मालकांना हे मोबाइल स्वाधीन करण्यात आले आहेत. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी आनंद व्यक्त केला आहे. अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या हस्ते हरवलेले मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर कक्षाचे सपोनि कैलास डाबेराव, पोहवा रुपेश वाघमारे पोशि आदेश चलवादी, मपोशि रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन, त्याचाचत तांत्रिक तपास करुन त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तसेच इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्यांशी तसेच संबधीत पोलीस ठाणेस कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अशा विविध भाषामध्ये संवाद साधून हरवलेले एकुण ११.५० लाख रु.कि.चे ५३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, प्रविण पाटील व परीमंडळ ०१ चे पोलीस उपआयुक्त,संदिपसिंह गिल्ल यांचे हस्ते परत करण्यात आले. सदर मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
पुणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, आपण प्रवास करताना बस मध्ये चढताना अगर उतरताना आपले मोबाईल व इतर मौल्यवान वस्तु संभाळावे. तसेच संशयीत व्यवत्ती घाटल्यास तात्काळ ११२ या नंबरवर संपर्क करावा. किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला जावुन तक्रार करावी.
मोवाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलीसांचे punepolice.gov.in/LostFound Reg या वेबसाईटला प्रथम तक्रार नोंद करावी, नोंद करताना जवळचे पोलीस स्टेशनचे नाव त्यात सिलेक्ट करावे व आपले जवळच्या पोलीस स्टेशनला जावुन त्याची एक कॉपी यावी. त्यानंतर हरवलेले मोबाईल मधील त्याच नंवरचे नविन सिमकार्ड घेवुन ते चालु करुन घेतल्यानंतर शासनाचे https://www.ceir.gov.in/ (CEIR) या पोर्टलवर नोंद करावी, नोंद करताना सदर वेबसाईटवर अर्जदाराचे तक्रारीची प्रत, मोचाईल पावती तसेच ओळखपत्र याची PDF अपलोड करुन चालु केलेल्या मोबाईल वर OTP प्राप्त करुन सबमिट करावी, असे आवाहन पुणे पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.
Pune Police News | Special visit of Pune Police on the occasion of Independence Day: 53 stolen mobiles handed over to citizens