Pune Police News | पुणे पोलीस दलातील ६ एसीपी, ३ वरिष्ठ निरीक्षक एकाचवेळी सेवानिवृत्त
- सुपारी घेऊन गुन्हे दाखल करणे पोलिसांची मानसिकता नव्हे
पुणे, दि. २९ मे, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Police News |
पुणे पोलीस Pune Police दलात कर्तव्यावर असणाऱ्या ६ सहायक पोलीस आयुक्त व ३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची नियत वयोमानासुसार निवृत्ती होत आहे. पुण्यात कर्तबगार कामगिरी करून गुन्हेगारांना, अवैध धंदेवाल्याना जेरीस आणणाऱ्या या सिनियर अधिकाऱ्यांच्या निवृत्तीमुळे पुणे पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण होणार आहे. सुपारी घेऊन गुन्हे दाखल करणे हि पोलिसांची मानसिकता नव्हे या विचारसरणीला जोपासत , सहकार्याची भूमिका घेत अधिनस्थ अधिकाऱ्यांना पाठबळ देत, नागरिकांचा पोलीस दलावर विश्वास वाढावा यासाठी हे अधिकारी सतत प्रयत्नशील असत.
पुणे पोलीस दलाचा सातबारा तोंड पाठ असणाऱ्या अधिकार्यांच्या सेवानिवृत्तीमुळे शहर पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.
तसेच पुणे शहर पोलीस दलात समर्थ, हडपसर, येरवडा, आर्थिक गुन्हे शाखा येथे सेवा बजावणारे व सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागात अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे बाळकृष्ण कदम याच महिन्यात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
सेवानिवृत्त होणारे अधिकारी
१. बाळकृष्ण कदम – अपर पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग
पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त
१. रुक्मिणी गलांडे – सहायक पोलीस आयुक्त, विश्रामबाग
२. अप्पासाहेब शेवाळे – सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा – २
३. भीमराव टेळे – सहायक पोलीस आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड
४. शाहूराजे साळवे – सहायक पोलीस आयुक्त, अभियान
५. आर. एन. राजे – सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर
६. ओव्हळे, सहायक पोलीस आयुक्त, पुणे मनपा अतिक्रमण
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
१. भरत जाधव – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग
२. सुभाष काळे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक
३. रजनीश निर्मल – वरिष्ठ पोलीस निरीक्षक
४. हाडके – वरिष्ठ पोलीस निरीक्षक