Pune News : आकाशात झेप घेण्याचे स्वप्न सत्यात उतरले : जिद्द, चिकाटी, परिश्रमाची यशोगाथा फ्लाईंग ऑफिसर अभिजीत कदम
•Pune News Flying Officer Abhijeet Kadam’s Dream Come True यशाच्या शिखरावर चढताना, घराच्यांचा आशीर्वाद आणि मेहनत यामुळे लहानपणी उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवले
पुणे :– आकाशात झेप घेण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले असताना ते सत्यात कसे उतरवायचे.आयुष्यात यशाच्या शिखरावर चढताना केवळ आणि केवळ मेहनत, एकाग्रता, निष्ठा आणि स्वप्न हे हत्यार आत्मसात करावे लागतात. आपण सर्वजण लहानपणी आयुष्यात काहीतरी देशाच्या हिताकरिता किंवा कुटुंबाकरिता काहीतरी चांगले आणि जगावेगळे करण्याची इच्छा बाळगून आपण आपली वाटचाल ठरवत असतो. अशीच वाटचाल पुण्यात राहणाऱ्या कदम कुटुंबियातील अभिजीत कदम यांनी ठरवली होती. मेहनतीच्या जोरावर अभिजीत Flying Officer Abhijeet Kadam आज देश सेवेत रुजू झाला असून फ्लाईंग ऑफिसर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. Pune News
अभिजीत याला लहानपणापासूनच देश सेवेमध्ये नोकरी करण्याची इच्छा होती. हे ध्येय साध्य करण्यासाठी सातारा सैनिक स्कूल येथे प्रवेश मिळवल्यानंतर इयत्ता नववी ते बारावी आपले शिक्षण सातारा स्कूल मधून पूर्ण केले. दहावी आणि बारावी राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती वर उत्तम टक्केवारी प्राप्त करत उत्तीर्ण झाला. घराची परिस्थिती बेताची असतानाही परिस्थितीवर मात करत अभ्यास करत राहिला. बारावीनंतर पहिल्या प्रयत्नातच यूपीएससी एनडीए परीक्षा उत्तीर्ण होत खडकवासला येथे तर फ्लाईंग साठी निवड झाली 146 व्या बॅचसाठी (2021) इंडियाच्या सहापैकी तीन टर्म मध्ये त्याला ब्राॅन्झ टार्ची आणि सहाव्या टर्म मध्ये विशेष प्राविण्य मिळवले “फ्लाईंग पिन” मिळाली . अभ्यासाबरोबर खेळातही याची अभिजीत याची कामगिरी वर चढत राहिली आहे. वॉलीबॉल, वॉटर पोलो, स्विमिंग यांसारख्या खेळात जबाबदारी कामगिरी करून गोल्ड आणि सिल्वर मेडल पटकावले आहे. पोलीस वायुसेनेच्या पुढील अभ्यासासाठी हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमी येथे वर्षभर विशेष प्रशिक्षणासाठी रवाना होत आहे. त्याच्या या जिद्दीला महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेकडून शुभेच्छा. Pune News
तरुणांसाठी एक विशेष सांगणं आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एका सतरा वर्षीय तरुणाने केलेल्या एक्सीडेंट कांड का अतिशय कमी वयात एनडीए परीक्षेतून उत्तीर्ण होऊन देशसेवेच्या हे साठी विशेष कामगिरी बजावलेल्या तरुणाचा आदर्श हे आजच्या तरुण पिढीसाठी अतिशय उत्तम उदाहरण आहे. Pune News