क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Murder | गुलटेकटी येथे मध्यरात्री तरुणाचा खून, पुणे ‘असुरक्षित’… हत्या सत्र सुरूच…

  • जामिनावर बाहेर आलेल्या गुंडांकडून तरुणाचा खून?

पुणे, दि. ४ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Murder

पुण्यात गुहेगारीचा चढता आलेख पाहता सामान्य नागरिकांसाठी पुणे ‘असुरक्षित’ असेच म्हणता येईल. दोन दिवसांपूर्वी नानापेठ भागात माजी नगरसेवक वनराज यांची हत्या झाली होती. त्या पाठोपाठ हडपसर येथे मोबाइलल हॉटस्पॉटच्या शुल्लक कारणावरून एका सामान्य नागरिकाचा खून झाला होता. आता या पाठोपाठ गुलटेकडी परिसरात एका तरुणाचा आज रात्री खून झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आज दि. ४ रोजी मध्यरात्री सुनील सरोदे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुनील सरोदे हा डायस प्लॉट येथे राहत होता. Pune Murder

रात्री सुनील सरोदे Sunil Saroade याचा जामिनावर बाहेर आलेले रोहन व शिवशरण कांबळे यांनी खून केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Pune Police पुणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0