क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune MD Drugs Racket | अबब कारच्या डिक्कीत सापडला ९८ लाखांचा एमडी : ड्रग्स डीलर पुणे पोलिसांच्या रडारवर

  • पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचेकडून ड्रग्स तस्करांविरुद्ध मोहीम
  • वपोनि उल्हास कदम व अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी

पुणे, दि. १० ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune MD Drugs Racket

Pune MD Drugs Racket busted by Pune Police | ड्रग्स तस्करांविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Ameteesh Kumar यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुन्हे शाखेच्या Crime Branch अंमली पदार्थ विरोधी ANC-1 पथकाकडून एका कारवाईत टिंगरे नगर (Tingare nagar) परिसरातून एका कारच्या डिक्कीत विक्रीसाठी ठेवण्यात आलेला अंदाजे ९८ लाख रुपयांचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त गुन्हे, अमोल झेंडे (DCP Amol Zende), सपोआ गणेश इंगळे (ACP-1 Ganesh Ingale) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वपोनि उल्हास कदम (Sr.Pi. Ulhas Kadam) व त्यांच्या पथकाकडून धडाकेबाज कामगिरी करण्यात आली आहे.

सदर कारवाईत संशयित आरोपी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे, निमेश अबनावे यांना पकडण्यात आले आहे.

विश्रांतवाडी परिसरामध्ये पेट्रालिंग करीत असताना, सांवत पेट्रोलपंपा कडुन, ५०९ चौका कडे पायी पेट्रोलिंग करीत जात असताना, एच.पी. पेट्रोल पंपासमोर सार्वाजनीक रोडवर, टिंगरे नगर, पुणे येथे रोडच्या कडेला एक मोटर सायकल वरील दोन इसम संशयीत रित्या कावऱ्या बावऱ्या नजरेणे कोणाची तरी वाट पाहत उभे असल्याने त्यांचा संशय पोलिसांना आला होता. यावेळी पोलिसांना पाहुन संशयित आरोपी श्रीनिवास संतोष गोदजे व रोहित शांताराम बेंडे तेथुन घाई घाईने गाडी चालु करुन निघुन जाऊ लागले. याचा पोलिसांना संशय येताच त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडे एकुण १,९१,६००/- रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आढळून आला.

संशयित आरोपी श्रीनिवास संतोष गोदजे व रोहित शांताराम बेंडे यांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी अंमली पदार्थ त्याचा साथीदार संशयित आरोपी निमेश अबनावे बाबत माहिती दिली. गुन्हे शाखेने संशयित निमेश अबनावे यास आदर्श कॉलनी, रोड नं ०२, विघ्नहर्ता अर्पाटमेन्ट समोर, टिंगरे नगर, पुणे येथे सापळा रचुन ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यातील फोर व्हिलर कारची झडती घेतली असता. त्याच्या कडे एकुण रु ९८,८८,८६०/- रुपये येणे वरील वर्णनाचा व किमतीचा एम.डी हा अंमली पदार्थ, दोन ईलेक्ट्रॉनिक वजन काटे, मोबाईल फोन व एक फोर व्हिलर कार मिळुन आले.

आरोपींकडून एकुण किं.रु. १,००,८०,४६०/- चा ऐवज त्यामध्ये कि रु ९४,२६,३६०/- चा ४७१ ग्रॅम ३१८ मिली ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, कि रु ८२,०००/- चे ०४ मोबाईल फोन, कि. रु. ७०,०००/- रुची दुचाकी, किं. रु.५,००,०००/- ची एक फोर व्हिलर कार, किं.रु.२,०००/- दोन इलेक्ट्रिक वजन काटा व इतर असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. २६३/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उप निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, सचिन माळवे, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहना शेख, नुतन वारे, नितेश जाधव, विनायक साळवे, विपुल गायकवाड, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0