Pune Crime News | सेवन लव्ह चौकात बंदूक घेऊन थांबणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड : खडक पोलिसांची कामगिरी
पुणे, दि. १० ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News
शहरातील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यापक प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील वर्दळीच्या सेवन लव्ह चौकात बंदूक घेऊन थांबणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. Pune Crime News
आरोपी शुभम अनिल शिंदे, रा. महर्षी नगर व सिद्धेश अशोक शिगवण रा. व्हेहिकल डेपो शेजारी, गुलटेकडी, पुणे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना मिळालेल्या बातमीवरून वपोनि शशिकांत शिंदे (Sr.Pi. Shashikant Chavan), गुन्हे निरीक्षक शर्मिला सुतार (Pi Sharmila Sutar) यांनी तपास पथकाचे सपोनि अनिल सुरवसे (Api Anil Survase) यांना कारवाईचे आदेश दिले होते.
आरोपीकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. अधिक तपास सपोनि अनिल सुरवसे करीत आहेत.