पुणे

अखेर..! वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कडून पुण्यातून उमेदवारी

Vasant More Joined VBA For Lok Sabha Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फारकत घेतलेले वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कडून पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नेते वसंत मोरे Vasant More गेले कित्येक दिवस लोकसभा निवडणुकी Lok Sabha Election करिता सातत्याने पुण्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच राजकारणातील महत्त्वाच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटीगाठी सातत्याने घेत होते. अखेर वंचित बहुजन आघाडी कडून VBA वसंत मोरे यांना पुण्याच्या लोकसभेचा उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी रात्री लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ( VBA Lok Sabha Election List)

पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे तर छत्रपती संभाजीनगरातून अफसर खान, शिरुर मतदारसंघातून मंगलदास बागुल, नांदेडमधून अविनाश बोसीरकर, परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यात सर्वात महत्त्वाचा वंचितच्या वतीने निर्णय घेण्यात आला असून बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार न देता त्यांनी सुप्रिया सुळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. (VBA Lok Sabha Election List)

वंचितने यापूर्वी दोन याद्या जाहीर केल्या

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या आधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या. तर आज तिसरी यादी जारी करण्यता आली. वंचितकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात 11 उमेदवारांचा समावेश होता. हिंगोलीतून डॉ. बी.डी चव्हाण, सोलापुरमधून राहुल गायकवाड यांना उमेदवारी तर माढ्यातून रमेश बारस्करांना उमेदवारी दिली. यापूर्वी देखील वंचितने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. ते अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. तर दुसऱ्या यादीत लातूरमधून नरसिंग उदगीरकर, साताऱ्यातून मारूती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकणंगले येथून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय ब्राम्हणे, जालन्यातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य येथून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून काका जोशी हे लोकसभा निवडणूक लढवणार आहे .(VBA Lok Sabha Election List)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0