पुणे, दि. २६ मार्च (मुबारक जिनेरी – राजकीय विश्लेषण) महाराष्ट्र मिरर : Pune Lok Sabha Election | History of Pune Lok Sabha: Not the greatest player achieved a hat-trick of victory
निवडणूक आयोगाने (Election Commission of India) लोकसभा (Parliament) निवडणुकीच्या घोषणा करताच संबंध देशात राजकीय आभाळ दाटून आले आहेत. निष्ठावंत व वेळेनुसार बदलणारे उमेदवार आपापल्या परीने कामाला लागले आहेत. महाराष्ट्र (Maharashtra ) राज्यात पाच टप्प्यात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान मतदान होणार आहे तर ४ जून (4 June Election Result) रोजी जनादेश समजणार आहे. अशातच नेहमीच चर्चेत असणारे पुणे लोकसभा मतदार (Pune Lok Sabha Election) संघ लक्ष वेधून घेत आहे. पुण्यात यापूर्वी काँग्रेसकडून सबसे बडा खिलाडी म्हणून ओळखले जाणारे सुरेश कलमाडी Suresh Kalmadi यांनी नव्हे तर सन १९८०, १९८४ व १९८९ साली काँग्रेस कडून विठ्ठलराव गाडगीळ Vitthalrao Gadgil यांनी विजयाची हॅट्रिक साधली होती. यानंतर कोणत्याही पक्षाला सलग तीन वेळा विजय मिळवता आला नाही. यावेळी भारतीय जनता पक्षाला विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे परंतु ईतिहास बघितला तर पुणेकर भाकर फिरवण्यात तरबेज आहेत. सबसे बडा खिलाडी, सुरेश भाई कलमाडी यांना सुद्धा सलग तीन वेळा निवडून येता आले नाही.
पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत आहे. पुणे भाजपचा गड समजला जातो परंतु रवींद्र धंगेकरांनी कसब्यातून यास सुरुंग लावला आहे. त्यामुळे भाजपचा गड धासडण्याची भीती निर्माण झाली आहे. पुणेकरांना भेडसावणारी ट्रॅफिक, अरुंद रस्ते, कचरा, पाणी व गुंडगिरी या मुद्यांवर उमेदवारांकडून अपेक्षा आहेत. भाजपसाठी विजयाचा मार्ग सोपा दिसत असला तरी जनतेच्या मनात घर करणारे धंगेकर वरचढ ठरतील कि काय अशी भीती भाजपच्या वरिष्ठ स्तरावर आहे. मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना काळातील कामकाज पुणेकरांना कायम लक्षात राहणार आहे. रुग्णांना सुविधा मिळवून देण्यासाठी महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल देश पातळीवर घेण्यात आली होती. यावेळी पुणेकरांसाठी मोहोळ कि धंगेकर तुलना करणे अवघड आहे. तरी ४ जूनला निकाल कोणाचा लागणार हे भाकीत करणे कठीणच आहे.
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य, मुंबई, उत्तर – मध्य, मुंबई दक्षिण – मध्य, मुंबई दक्षिण