Imran Shaikh Bailed : जमीन फसवणूक प्रकरणातून काँग्रेसचे इम्रान शेख यांना जामीन
Court Give Congress Member Imran Shaikh Bailed : ऍड बिलाल शेख यांचा युक्तिवाद, लष्कर कोर्टाकडून जामीन मंजूर
पुणे, दि. 23 एप्रिल, महाराष्ट्र मिरर :
Pune News : हडपसर जेएसपीएम Hadapsar JSPM College कॉलेज जवळील जागेची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात काँग्रेस नेता इम्रान (कट्टा) शेख Imran Shaikh यांना प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन Bailed मंजूर केला आहे. इम्रान शेख यांच्याकडून ऍड बिलाल शेख यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला त्यास न्यायालयाने मान्य करून जामीन मंजूर केला आहे. Pune Lok Sabha Election News
यापूर्वी आज दि. 22 रोजी मध्यरात्री इम्रान शेख यांना वानवडी पोलिसांकडून ताब्यात घेणयात आले होते. कोर्टासमोर इम्रान शेख यांना हजर केले असता प्रसिद्ध क्राईम वकील ऍड बिलाल शेख यांनी इम्रान शेख यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मोडून काढत सदर बाब सिव्हिल स्वरूपाची असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी इतर दोघांना यापूर्वी सेशन कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाल्याचे व एकास हाय कोर्टाकडून जामीन मिळाल्याचे कोर्टाला दाखवून दिले. ऍड बिलाल शेख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून लष्कर कोर्टाचे न्यायाधीश चेतन जगताप यांनी इम्रान शेख यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. Pune Lok Sabha Election News
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुरन. १६२/२०२४ भादंवि १२० ब, ३४, ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४५२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल होता.
राजकीय ‘विकेट’ !
इम्रान शेख याचा हडपसर वानवडी प्रभागातील वाढता प्रभाव पाहता सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कमी कालावधी सामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख झाली होती. नागरिक त्यांना दयावान म्हणून ओळखू लागले होते. काँग्रेस पक्षातील मातब्बर नेत्यांसमवेत त्यांची जवळीक वाढली होती. काँग्रेस नेते नाना पटोले, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी मंत्री शिवरकर यांनी इम्रान शेख यांना प्रोत्साहीत केले होते अशातच राजकिय मैदानातून इम्रान शेख यांना बाहेर काढण्यासाठी विरोधकांकडून त्यांची ‘हिट’ विकेट काढण्यात आल्याचा आरोप त्यांचे निकटवर्तीय करीत आहेत. Pune Lok Sabha Election News