क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Drugs News : अंमली पदार्थ तस्करांना कठोर शिक्षा! 115 किलो गांजा प्रकरणी आरोपींना 15 वर्षे सक्तमजुरी

Mumbai Latest Drugs News : घाटकोपर येथील गुन्ह्यात मुंबई सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; दोन आरोपींना 1.50 लाख रुपयांचा दंड

मुंबई :- मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या बृहन्मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. Ghatkopar Drug News घाटकोपर येथे 115 किलो गांजा तस्करी प्रकरणी दाखल गुन्ह्यात, विशेष सत्र न्यायालयाने दोन आरोपींना १५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 1.50 लाख रुपयांची दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. Mumbai Police Latest Crime News

दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष (ANC), कांदिवली युनिटने गुप्त माहितीच्या आधारे घाटकोपर बस आगार बस स्टॉपजवळ सापळा रचला होता. या कारवाईत आरोपी इस्माईल सलीम शेख (वय 21) आणि इमरान अबरार हुसेन अन्सारी (वय 42, चालक) यांच्या ताब्यातील होंडा ॲकार्ड कारमधून 115 किलो गांजा (अंदाजित किंमत 28.75 लाख ) आणि कार असा एकूण 33 लाख 75 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर त्याचे सहकारी अल्ताफ मुल्का शेख आणि चक्रापाणी भल्लू गौडा यांनाही गुजरात येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

विशेष सत्र न्यायालय, मुंबई येथे या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने आरोपी इस्माईल शेख आणि इमरान अन्सारी यांच्याविरुद्ध सादर केलेले पुरावे आणि सखोल तपास ग्राह्य धरून, दोघांनाही 15 वर्षे कारावासाची आणि प्रत्येकी 1.50 लाख रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खंडागळे यांनी पूर्ण करून वेळेत दोषारोपपत्र दाखल केले होते. ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. बृहन्मुंबई पोलीस हे अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील आहेत, हे या कठोर शिक्षेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0