- जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढले आदेश
पुणे, दि. ७ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Pune Dry Day
गणेश उत्सव कालावधीत पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या विश्रामबाग, फरासखाना व खडक हद्दीत दि. ७ ते दि. १८ पर्यंत ‘ड्राय डे’ Pune Dry Day जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत आज आदेश निर्गमित केले आहते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Ameetesh Kumar यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
गणेश उत्सव कालावधीत शहरातील मध्यवर्ती भागात अनुचित प्रकार घडू नये यासाठी विश्रामबाग, फरासखाना व कडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. ७ ते विसर्जन दि. १८ सप्टेंबर पर्यंत मद्य विक्रीला परवानगी नाकारण्यात आली आहे.
तसेच शहरातील इतर भागात दि. ७ व दि. १८ रोजी मद्य विक्री बंद राहणार आहे.