Pune MD Drug case | कात्रज परिसरातून एमडी तस्करांना बेड्या : १२ लाखांचा माल जप्त : भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
- 54 ग्रॅम 51 मिलीग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करुन दोन आरोपींना अटक
पुणे, दि. ७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune MD Drug Case
पुणे शहर ड्रग्स मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. आज एका कारवाईत भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन एमडी तस्करांना बेड्या ठोकत तब्बल १२ लाखांचा माल जप्त केला आहे.
संशयित आरोपी मल्लीनाथ बसवराज गौडगाव,वय 29 वर्षे,रा.चंद्रभागानगर,भोसले यांचे बिल्डींगमध्ये आंबेगाव बु,पुणे मुळ जि.सोलापुर व नैाशाद अब्दुलअली शेख,वय 36 वर्षे,रा.पडेगाव, औरंगाबाद(संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांचे बातमीवरुन सदर कारवाई करण्यात आली.
नवले पुलाकडुन कात्रजकडे जाणाऱ्या हायवेवरील राजमाता उदयान समोरील रोडवर संशयित मल्लीनाथ बसवराज गौडगाव व नैाशाद अब्दुलअली शेख यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे एकुण १२ लाख रुपयांचा माल त्यामध्ये 2,45,400/- रुपयांचे 12 ग्रॅम 27 मिलीग्रॅम वजनाची पिवळसर रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन (एम.डी.) MD drug व 8,44,800/- रुपयांचे 42 ग्रॅम 24 मिलीग्रॅम वजनाची पांढरट रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन (एम.डी.) असा एकुण 54 ग्रॅम 51 मिलीग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आढळून आले.
पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी सरकारतर्फे दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन,पुणे शहर गुन्हा रजि नंबर 716/2024 एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम 8(क),21(क),29 अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यामध्ये नमुद दोन्ही इसमांना अटक केली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुकत,पश्चिम प्रादेशीक विभाग,पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी,यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे,सचिन सरपाले,अभिनय चौधरी,सागर बोरगे,शैलेश साठे,नामदेव रेणुसे,महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे,मंगेश पवार,अवधुत जमदाडे,सतिश मोरे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमाले,यांच्या पथकाने केली आहे.