क्राईम न्यूजपुणे

Pune Crime News | वानवडीत बिल्डरची कोट्यवधीची फसवणूक : मंगेश चंद्रमौर्य यांच्यासह ५ जणांवर गुन्हा

पुणे, दि. ३ एप्रिल, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News

वानवडी महेदवी नगर येथील दुकाने तब्बल ४ कोटी २५ लाख रुपयांना बेकायदा विक्री करून बिल्डरची फसवणूक केल्याप्रकरणी मंगेश चंद्रमौर्य यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगेश चंद्रमौर्य याने महेदवी नगर संस्थेतील सभासदांना हाताशी धरून सदर फसवणूक केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. Pune Crime News

याबाबत १.उज्वल योजिराज साखरे (महाराज) मयत, २. सय्यद अब्दुल करीम मोहम्मद (मयत), ३. मुश्ताक निसार मोमीन ४. अब्बास मोहम्मदअली वारसी व ५. मंगेश अरुण चांद्रमोर्य यांच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुरन. २४६/२०२४ भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ व १२०-बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी मनोज मांढरे हे तक्षशिला कन्स्ट्रक्शन संस्थेत भागीदार आहेत. सन २००६ साली धीरोत्तमा विवेक जोशी यांच्याकडून महेदवी नगर सहकारी गृहरचना संस्था विकसनासाठी फिर्यादी यांनी घेतली होती. याबाबत २००६ मध्ये ११/०७/२००६ रोजी विकसन करारनामा हवेली क्र. २० दस्त ०५००१/२००६ अन्वये नोंदणीकृत झाला. या व्यवहाराविरोधात महेदवी संस्थेने आक्षेप घेऊन सन २००७ मध्ये दिवाणी दावा १४९/२००७ दाखल केला. यानंतर महेदवी संस्थेने फिर्यादी यांच्याशी वाटाघाटी करून विकसन करारनामा दस्त क्र १२१/२००८ दि. ०४/०१/२००८ रोजी करण्यात आला.

याच दरम्यान महेदवी संस्था व फिर्यादी यांनी ठराव करून उज्वल योगीराज साखरे (महाराज) यांना केयर टेकर नियुक्त केले होते. महेदवी संस्थेच्या व्यवस्थापक समितीचा कार्यकाळ दि. १४ एप्रिल २०१६ रोजी संपला होता. यामुळे उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांनी सदर संस्थेवर विनोद देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.

दरम्यान सन २०१७ साली संस्थेच्या व्यवस्थापक समितीचा कार्यकाळ संपुष्ठात आला असताना देखील व्यवस्थापक समितीचे चेअरमन सईद अब्दुल करीम मोहम्मद (मयत), कार्यकारी सदस्य अब्बास मोहमदअली वर्षी व कार्यकारी सदस्य मुस्ताक निसार मोमीन यांनी महेदवी नगर सहकारी हौसिंग सोसायटीच्या जमिनीवर बांधलेल्या एच व आय या बिल्डिंग मधील तळमजल्यावरील ४ गोडावून १,२,३,४ व पहिल्या मजल्यावरील ४ दुकाने १,२,३,४ असे ४.२५ कोटी रुपयास मे. रचना कन्स्ट्रक्शनचे निलेश पटेल यांना दस्त क्र १६६२/२०१७ दि. ६/३/२०१७ अन्वये विक्री केले. सदर रक्कम महेदवी संस्थेच्या खात्यावर न वाठिवता ती उज्वल साखरे (महाराज) यांच्या खात्यात टाकण्यात आली.

मयत साखरे महाराज याने त्याचा जवळचा साथीदार मंगेश चांद्रमोर्य यास हाताशी धरून महेदवी संस्थेच्या पदाधिकारी यांना हाताशी धरून मे. रचना कन्स्ट्रक्शनचे निलेश पटेल यांच्यासोबत गैरव्यवहार घडवून आणल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0