Uncategorized
Trending

Pune Crime News : बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक ; पर्वती पोलीसांची धडाकेबाज कारवाई

Parvati police arrested two people For Illegal Gun Use : पर्वती पोलीसांनी बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक, वपोनि नंदकुमार गायकवाड यांची धडाकेबाज कामगिरी

पुणे :- आगामी विधानसभा निवडणुका Vidhan Sabha Election आणि नवरात्र Navratri Ustav उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून बेकायदेशीर अवैध धंदे, जुगार, मटका, हुक्का पार्लर, डान्सबार तसेच बेकायदेशीर हत्यार आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर‌ कारवाईचा बडगा उभारला आहे. पर्वती पोलीस Parvati police ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या पथकाने धडक कारवाई करत दोन बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या विरुद्ध वेगवेगळ्या कारवाया करत आरोपींना अटक केली आहे. Pune Crime News

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या सूचनेनंतर पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार आणि त्यांच्या पथकाने सूचना दिल्याप्रमाणे पोलिस अंमलदार अमोल दबडे व अमित चिव्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले दोन आरोपी हे बेकायदेशीररित्या हत्यार बाळगून असल्याचे बातमी मिळाली होती. या माहितीनुसार पोलीसांनी तन्मय राजू थोरात (21 वय रा. रविवार पेठ नाईक हॉस्पिटल जवळ पुणे) प्रशांत बाळासाहेब धुमाळ (35 वय, रा. गजानन महाराज मठ लक्ष्मी चौक) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या दोन्ही आरोपींना बेकायदेशीर गावठी पिस्तोलसह अटक करण्यात आली आहे. दोघांवर पार्वती पोलीस ठाण्यात भारतीय तर कायदा कलम 3(25) महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियमन कलम 31(1) सह 135 प्रमाणे कारवाई केली असून दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पर्वती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार हे करत आहे. Pune Crime News

पोलीस पथक

अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विमाग प्रविण पाटील,पोलीस उप-आयुक्त परि 3 संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अजय परगार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस ठाणे नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक सचिन पवार, किरण पवार, तसेच पोलीस अंमलदार, अमोल दबडे, अमित चिव्हे, सुभाष मोरे, पुरुषोत्तम गुन्ला, सद्दाम शेख, सुर्या जाधव, अनिस तांबोळी, अविनाश कांबळे, राकेश क्षिरसागर यांनी केली आहे. Pune Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0