
Mumbai Wadala TT Police Busted Ganja Dealer : गांजाच्या विक्रेत्यांना ५१ किलो ५०० ग्रॅम गांजासह अटक
मुंबई : वडाळा टी. टी. पोलीस Mumbai Wadala TT Police ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गांजाची अवैध विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून तब्बल ५१ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ₹१०.३० लाख इतकी असल्याचे समोर आले आहे. Mumbai Latest Crime News
दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.४० वाजता गस्तीदरम्यान पोलिसांना पांढऱ्या रंगाच्या वॅगन-आर कार (क्र. MH 01 EE 3013) वर संशय आला. पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने कार अडवून तपासणी केली असता कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा आढळला.
या प्रकरणी अबुबकर मेहंदीहसन शान व शहबाज शमीम खान या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गु.र. क्र. ५५९/२०२५, कलम ८(क), २०(ब)(२)(क) सह २९, अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act, १९८५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयाने २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईचे मार्गदर्शन मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) रागसुधा आर., सहायक पोलीस आयुक्त (सायन विभाग) शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे व पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले यांनी केले.
ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, माधवेंद्र येवले तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील धनंजय जाधव, अजुमुद्दीन मिर, संपत गोसावी, रविंद्र ठाकुर, रमेश कुटे, बापु पाटोळे, राजू शिंदे, रणजित चौधरी, आनंद भोसले, विजय हनुमंते, नबीलाल बोरगावकर, शफीक शेख, रमेश बोरसे यांनी संयुक्तरित्या केली.


