Pune Crime News : नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल खडक पोलिसांनी केले परत
Pune Police Return Stolen Mobile : संदिपसिंह गिल्ल, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-01, पुणे शहर यांच्या हस्ते 25 मोबाईल फोन नागरिकांना परत दिले, नागरिकांमध्ये समाधान I Pune Crime News
पुणे :- रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, न्यायालय, तहसीलदार, सरकारी रुग्णालये या विविध वर्दळीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले 25 मोबाइल खडक पाेलिस ठाण्याच्या Khadak Police Station पाेलिसांनी शिताफीने शाेधून काढले. नागरिकांना आज हे माेबाइल फाेन सन्मानपूर्वक परत करण्यात आले. यावेळी माेबाइल परत हातात मिळाल्याच्या आनंदाने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. Pune Police पोलिसांनी चार लाख किमतीचे 25 मोबाईल नागरिकांना परत दिले आहे. 2023 आणि 2024 मध्ये चोरीस गेलेले गहाळ झालेले मोबाईल फोन यांच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तसेच चोराचा शोध घेऊन मोबाईल परत मिळून दिले आहे. Khadak Police Return Stolen Mobile
पोलीस उप आयुक्त परिमंडळ -01 पुणे शहर संदिपसिंह पिल्ले यांच्या कार्यालयात त्यांच्या हस्ते नागरिकांना माेबाईल परत करण्यात आले. या वेळी खडक पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक मच्छिंद्र खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विश्वजीत काईगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर, संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर, राकेश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, प्रल्हाद डोंगळे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार सागर कुडले यावेळी उपस्थित होते. Khadak Police Return Stolen Mobile
अनेकांनी माेबाइल परत मिळाल्याने पाेलिसांचे आभार व्यक्त करीत त्यांच्या या कामागिरीचे काैतुक केले. हरवलेला मोबाईल अनेकदा पुन्हा मिळत नाही, मात्र पाेलिसांनी हरवलेला मोबाईल पुन्हा मिळवून देण्याची किमया साधल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. Khadak Police Return Stolen Mobile