पुणेक्राईम न्यूज
Pune Crime News : जबरी चोरी (चैन स्नॅचिंग) च्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी युनिट-3 च्या ताब्यात

• गुन्हे शाखा युनिट-3, पुणे शहर सोनसाखळी चोरास पोलिसांनी केले अटक, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे :- सोनसाखळी चोरास पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.आज (24 एप्रिल 2024) रोजी गुन्हे शाखा युनिट 3 कडील अंमलदार मुख्य फरार तडीपार आरोपींचा शोध घेत असताना सिंहगड रोड पोलीस ठाणे भादवि कलम 392,441,506,34 सह आर्म ऍक्ट 4(25) मपोका कलम 37(1)135 या गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी विशाल सज्जन फाळके (रा. मुक्काम पोस्ट वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली) हा शिवाजीनगर कोर्ट च्या बाहेर मेट्रो स्टेशन जवळ उभा असल्याची माहिती सहाय्यक फौजदार संतोष क्षीरसागर व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. Pune Crime News बाबत वरिष्ठांना यांना कळविले असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता वर नमुद गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी हा सदर ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील चौकशी कामेयुनिट 3 कार्यालयात आणून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव, पत्ता विशाल सज्जन फाळके रा. मुक्काम पोस्ट वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली असे सांगितले.त्यास अधिक विश्वासात घेऊन वरील दाखल गुन्ह्याबाबत त्याचेकडे चौकशी करता गुन्हा हा त्याने केला असल्याची कबुली दिली. आरोपीची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाईकामी सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे ताब्यात रिपोर्टाने देण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिले आहे. Pune Crime News