क्राईम न्यूजपुणे

युनिट-1 गुन्हे शाखेकडुन कारवाई ; स्वतःच्या मुलाचे खुनाचा कट रचुन सुपारी देणा-या बापासह एकुण 6 जणाला केले गजाआड

Pune Crime Branch Arrested Criminal : पोलीस कारवाईतून आरोपींकडून‌ एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस हस्तगत

पुणे :- स्वतःच्या मुलाचा खुनाचा Murder कटरा असणाऱ्या आरोपी वाडिलांना पोलिसांनी Pune Police अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी आरोपी वडील आणि त्यांच्या साथीदाराकडून गावठी पिस्टल आणि काडतुसे Pistol And Magazine जप्त करण्यात आल्या आहेत.(16 एप्रिल) रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे (Shivaji Nager Police Station) भा.द.वि.कलम 307,34 आर्म ॲक्ट कलम 3 (25), महाराष्ट्र पोलीस कायदा 34 (1) सह 135 येथे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी हे त्याचे जंगली महाराज रोड वरील अरगडे हाईट्स येथील कार्यालयातुन दुपारी 2.45 वा.चे.सुमारास खाली येवुन त्यांचे स्वीफ्ट गाडीमध्ये गाडीचे काच खाली करुन बसले असताना समोरुन दोन अनोळखी हेल्मेटधारी व्यक्ती मोटर सायकल वर येवुन त्यांचे गाडीचे दरवाजाला चिकटुन मोटर सायकल उभी करुन पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्याचे जवळील पिस्टलने दोन वेळा फायर करण्याचा प्रयत्न केला परंतु फायर न झाल्याने वाचलास तु असे म्हणुन ते दोघेही तेथुन निघुन गेले. Pune Crime News

पोलिसांकडून 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले

दुचाकी वरील मोटर सायकलस्वार तोंडाला मास्क लावुन त्यावर हेल्मेट घातलेले, स्वीगीचे टीशर्ट घालुन, स्वतःची ओळख पुर्णपणे लपविली असताना युनिट 1 कडील अधिकारी आम्ही स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक कवठेकर व अंमलदार यांनी सतत चार दिवस जंगली महाराज रोड पासुन ते सुतारदरा कोथरुड पर्यंत सरकारी व स्थानिक असे अंदाजे 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेरे पाहुन तसेच तांत्रिक विश्लेषण करुन सदर गुन्हयातील फायरिंग करण्याचा प्रयत्न केलेला मुख्य आरोपी प्रविण तुकाराम कुडले रा. सुतारदरा यास निष्पन्न करुन व त्यास ताब्यत घेवून त्याचेकडे केलेल्या सखोल तपासामध्ये त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार योगेश दामोदर जाधव (39 वर्षे ) रा. सुतारदरा कोथरुड पुणे याचेसह केल्याचे सांगितले. त्याचे सांगणे वरुन योगेश जाधव यास ताब्यात घेतले तसेच आरोपी प्रविण कुडले याचेकडे केलेल्या तपासाचे दरम्यान चर्तुश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीमधील स्काय स्टोरीज हॉटेल पाषाण सुस रोड पुणे या ठिकाणी देखील त्याने त्याचा साथीदार चेतन अरुण पोकळे (27 वर्ष) रा. शांतिनिकेतन सोसायटी वारजे पुणे याचेसह फिर्यादी यास चाकुने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादीने वार चुकवल्याने फिर्यादीचे उजवे बाजुच्या खांद्यावर व उजवे हाताच्या मनगटावर मारुन जखमी केल्याचे सांगितले. त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले आरोपी चेतन अरुण पोकळे यास ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये सदर गुन्हयाचा कट रचुन सुपारी देणारे निष्पन्न झालेले आरोपी प्रशांत विलास घाडगे (38 वर्षे) रा वारजे जकातनाका पुणे व अशोक लक्ष्मण ठोंबरे (48 वर्षे ) रा. गणेशनगर एरंडवणा पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या तपासामध्ये सदर गुन्हयाचे कटाचा मुख्य सुत्रधार दिनेशचंद्र ऊर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे (रा. भोसले नगर पुणे) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या तपासाअंती त्यांनी प्रशांत घाडगे यास त्यांचा फिर्यादी मुलगा यास जिवे मारणेकरिता एकुण 75 लाख रु.ची सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. Pune Crime News

चतुःश्रृंगी व शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्हयातील फिर्यादी हे एकच असुन त्यांचे वडील दिनेशचंद्र ऊर्फ बाळासाहेब अरगडे यांनी अटक 5 आरोर्पीसह कटकारस्थान रचुन गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयामध्ये 6 आरोपींना अटक करुन त्यांची दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असुन रिमांड मध्ये आरोपी प्रविण कुडले याचे कडुन गुन्हा करते वेळी वापरलेली एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस व स्वतःची ओळख लपवणे करिता वापरलेलें स्वीगीची टीशर्ट, स्वीगीची बॅग, कपडे, बुट, गाडीचे बनावट नंबर प्लेट, गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करण्यात आले आहे. यातील आरोपी प्रविण ऊर्फ पन्या कुडले हा कोथरुड पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी असे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत. Pune Crime News

पोलीस पथक
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर शैलेश बलकवडे,पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे 1. पुणे शहर सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 1, गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, दरोडा वाहनचोरी विरोधी पथक चे पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक रमेश तापकीर, गौरव देव, राम दळवी, गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार राहुल मखरे, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, आण्णा माने, अभिनव लडकत, शशिकांत दरेकर, महेश बामगुडे, निलेश साबळे, आय्याज दड्डीकर, शुभम देसाई, विठ्ठल साळुंखे, महेश सरतापे, अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, विजु कांबळे, चंद्रकांत ऊर्फ मॅगी जाधव, धनंजय ताजणे, रवि लोखंडे, निखील जगदाळे, रविंद्र रोकडे, महिला पोलीस अंमलदार रुक्साना नदाफ यांनी केली आहे. Pune Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0