Pune Crime News : घरफोडी करून पोलिसांना तुरी देऊन फरार असलेल्या सराईत आरोपीला अटक
Pune Crime Branch 5 Arrested Robbers : चोरीच्या गुन्ह्यात फरार शअसलेल्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा-5ला यश आले आहे.अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
पुणे :- चोरीच्या गुन्ह्यातील Pune Robbery Case फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा -5 Pune Crime Branch 5 यांना यश आले आहे. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. बबलूसिंग टाक (42 वय) असे या आरोपीचे नाव असून तो महात्मा फुले वसाहत परिसरातील वास्तव्यास होता. आरोपी बबलू सिंग यांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात Sangali Gramin Police Station भारतीय न्यायसंहिता सन 2023 चे कलम 305 (अ),331(3) हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. आरोपी हा अट्टल चोरटा असून त्यांनी अनेक वेळा पोलिसांना तुरी देऊन चोरीच्या घटना करूनही तिथून फरार झाला आहे. तसेच तो वारंवार स्वतःची ओळख बदलून पोलिसांना चकवा देऊन वास्तव्याची आपल्या ठिकाणी बदलत होता. Pune Latest Crime News
गुन्हे शाखा कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड वरील आरोपींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली होती. आरोपी बबलूसिंग टाक हा सातववाडी, हडपसर पुणे या ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आरोपी बबलू सिंग यांचा पाठलाग करत त्याला मोठ्या शिताफीने या परिसरातून त्याला अटक केली. Pune Latest Crime News
बबलूसिंग या आरोपीवर सांगली ग्रामीण पोलीस, विटा, संजय नगर या पोलीस ठाण्यांत पाच चोरीचे गुन्हे दाखल असून गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपीबाबत अधिक तपास करीत आहेत.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, Pune CP Amitesh Kumar सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहायक पोलीरा आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट 5 गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, अमित कांबळे, उमाकांत स्वामी, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, पृथ्वीराज पांडुळे, विनोद निंभोरे, संजयकुमार दळवी, शुभांगी म्हाळशेकर व स्वाती गावडे या पथकाने केली आहे. Pune Latest Crime News