IND vs BAN, 2nd Test: : भारत आणि बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ 233 धावांवर ऑलआऊट
India vs Bangladesh, 2nd Test Match: भारतीय गोलंदाजाचे दमदार कामगिरी, दोन दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर सामना सुरू
BCCI :- भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे.शनिवार आणि रविवारी एकही चेंडू टाकता आला नाही. मैदान ओले असल्याने सामना सुरू होऊ शकला नाही.आजच्या सत्रात पहिल्या डावात बांगलादेशला 233 धावांवर सर्वबाद केले. बांगलादेशकडून मोमिनुल हकने दमदार फलंदाजी केली. त्याने नाबाद शतक झळकावले.
टी-ब्रेकनंतर भारताने पहिल्या डावात 16 षटकांत 3 गडी गमावून 138 धावा केल्या. 36 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. गिलने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. शाकिबने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऋषभ पंत 4 धावा करून खेळत आहे.यशस्वी 51 चेंडूत 72 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. हसन मोहम्मदने यशस्वीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.रोहित 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. मेहदी हसन मिराजने रोहितला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
भारत आणि बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन
भारत – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश – शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.