क्राईम न्यूज

Pune Crime News | महिलांचे मंगळसूत्र हिसकावणारा सराईत सिंहगडरोड पोलिसांकडून जेरबंद

  • शेयर मार्केटच्या व्यसनातून केला उदव्याप

पुणे, दि. २९ फेब्रुवारी, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Sarait Sinhagad Road, which snatched mangalsutra from women, was jailed by the police : Udvyap was made from share market addiction.

पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात पायी चालणाऱ्या महिलांना टार्गेट करून त्यांचे मंगळसूत्र हिसकवणारा सराईत चोरटा सिंहगडरोड पोलिसांकडून जेरबंद करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कुंभार व तपास पथकाकडून सदर दर्जेदार कामगिरी करण्यात आली आहे.

सराईत चोरटा सुमित इंगळे, वय २८, रा. मारूंजे (मूळ बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर चोरटा हा बार्शी जि. सोलापूर येथील मूळ रहिवासी असून शेयर मार्केटच्या व्यसनातून स्वतःची २ एकर जागा विकून लाखो रुपये मार्केटमध्ये गमावल्याने त्याने चोरीचा उदव्याप सुरु केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सिंहगडरोड परिसरात महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्याने वपोनि विजय कुंभार यांनी तपास पथकाला चोरट्याला पकडण्यासाठी आदेशित केले होते. यावेळी तपास पथकाचे पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे, राजू वेंगरे यांना मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. गोपनीय माहितीवरून प्रयेजा सिटी रोड, गिरीजा हॉटेलच्या बाजूस असणाऱ्या बस स्टॉप जवळ वडगाव येथे कारवाई करून सराईत चोरटा सुमित इंगळे यास ताब्यात घेण्यात आले.

पोलीस तपासात सराईत चोरट्याने सिंहगडरोड, भारती विद्यापीठ, अलंकार, चतुःश्रुंगी, रावेत हद्दीत ८ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. यावेळी गुन्ह्यातील एकूण १५.५ तोळे सोने आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे.

सदर कामगीरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कुंभार, सपोनि सचिन निकम, उपनि संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार आबा उतेकर, संजय शिंदे, तानाजी तारू, देवा चव्हाण, सागर शेडगे, राजू वेंगरे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0