Pune Crime News | ‘घोडा’ हाताळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पुणे पोलिसांकडून झाडाझडती
- Pune Crime News | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी व्यापक उपाय योजना
पुणे, दि. १६ एप्रिल, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News
भाईगिरीच्या भाषेत ‘घोडा’ म्हणजेच बंदूक हाताळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आज दि. १६ एप्रिल रोजी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. यावेळी गुन्हे शाखेकडून तब्बल २०० गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात हजर करण्यात आले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar यांच्याकडून गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी व्यापक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. लोक सभा Lok Sabha Election निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलीस सतर्क असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गँगस्टर, अवैध धंदेवाले पाठोपाठ आता बंदूक हाताळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पोलीस आयुक्त यांच्याकडून सातत्याने गुन्हेगारांचे नामोहरण करण्यासाठी प्रयत्न वाखण्याजोगे आहेत.
दरम्यान, सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर देशात खळबळ उडाली होती. गोळीबाराच्या घटना रोखणे हे पुणे पोलिसांसोमोरील मोठे आव्हान आहे.