पुणेक्राईम न्यूज

Pune Crime News | रेकॉर्डवरील गुंडाकडून पोलीस अंमलदार यांना मारहाण : हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल

  • Pune Crime News | हडपसर तुकाई टेकडी परिसरात गुंडगिरी वाढली !

पुणे, दि. १६ एप्रिल, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News

जनसेवा कॉलोनी हडपसर येथे काही मुले गोंधळ करीत असल्याचा नियंत्रण कक्षाकडून Pune Police Control Room मिळालेला संदेश हाताळण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदारालाच रेकॉर्डवरील गुंडाकडून मारहाण झाल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपीला पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अंमलदाराला मारहाण झाल्याने गुंडगिरी अद्याप संपुष्ठात आली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हडपसर पोलीस Hadapsar Police Station ठाण्याकडील पोलीस अंमलदार गणपत भिसे हे दि. १५ एप्रिल रोजी कर्तव्यावर असताना पुणे नियंत्रण कक्षाकडून जनसेवा सोसायटी येथे काही मुले गोंधळ करीत असल्याचा कॉल मिळाला. यावेळी मार्शल ड्युटीवर असणारे पोलीस अंमलदार गणपत भिसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी रेकॉर्डवरील आरोपी आदिल मुख्तार शेख, वय २० वर्ष, रा. काळेपडल हा सदर गोंधळात सहभागी असल्याने त्याला चौकशीसाठी पोलीस चौकीत घेऊन जात असताना आरोपी आदिल शेख याने पोलीस अंमलदार भिसे यांच्यावर हल्ला केला.

पोलीस अंमलदार भिसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिल मुख्तार शेख, वय २० वर्ष, रा. काळेपडल याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात ६५६/२०२४ भादंवि ३५३, ३२३, ३५२, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

आरोपी आदिल मुख्तार शेख यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सपोनि अब्दागिरे करीत आहेत.Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, सीएए आणि एनआरसी या मोठ्या घोषणा

Mumbai Crime News : सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना केले अटक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0