क्राईम न्यूजपुणे

Pune Police News : गावठी हातभट्टी दारूचा व त्यासाठी लागणारे रसायन (जमीनीखाली असलेल्या टाक्यामधील) साठा उधवस्त

Pune Police Busted Illegal Alcohol Factory : पुणे पोलीस विभागाचे कामगिरी ; गावठी हातभट्टी दारू उध्वस्त,विक्री करणा-यावर कारवाई करून 1 कोटी 6 लाख 95 हजार रू.चा मुद्देमाल जप्त.

पुणे :- गावठी हातभट्टी दारू उध्वस्त, Illegal Alcohol Factory करण्यात आले आहे.23 एप्रिल 2024 रोजी शेत गट क्र. 421, वडगाव शिंदे, ता. हवेली. जि. पुणे येथे गावठी हातभट्टी दारु व त्यासाठी लागणा-या रसायणाचा साठा असलेबाबत Pune Police पोलीस अंमलदार भिवरकर व जमदाडे यांना गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील Pune Crime Branch अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, एकुण सात ठिकाणाहुन (जमिनी खालच्या टाक्या) 2 लाख 10 हजार लिटर हातभट्टी दारू तयार करणेसाठी लागणारे रसायन त्याची किंमत 1 कोटी 05 हजार व तयार हातभट्टी दारू 1500 लिटर त्याची अंदाजे किं 1 लाख 80 हजार व हातभट्टी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 15 हजार रू असा एकुण कि.अं. 1 कोट 6 लाख 95 हजार रू.चा मुद्देमाल मिळुन आला असुन सदर बाबत 03 आरोपी त्यांचे विरूध्द स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी मनुष्यास गुंगी येवुन जिवीतास हानी होईल अशा प्रकारे गावठी हातभट्टी दारू तयार केले म्हणुन लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 328,34 महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा कलम 65 (ख) (च) (ड) अन्वये तीन व्यक्ती विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Pune Crime News

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर अमोल झेंडे यांचे आदेश मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, ओंकार कुंभार, इरफान पठान, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, सागर केकाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे या पथकाने यशस्वी केली आहे. Pune Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0