Pune Crime News : गुन्हेगारांना पोलिसांचा दणका! औद्योगिक पट्ट्यातील 26 सराईत तडीपार

•पिंपरी-चिंचवड परिमंडळ तीनमधील म्हाळुंगे, भोसरी, चाकण आणि चिखलीतील गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीन हद्दीतील औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. म्हाळुंगे, भोसरी एमआयडीसी, चाकण, चिखली आणि दिघी भागातील एकूण 26 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईचा आदेश अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिला असून, माहिती पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.
या गुन्हेगारांमध्ये काही टोळ्यांचे सदस्यही आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 19 जणांना दोन वर्षांसाठी, तर सात जणांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, जानेवारी ते मे 2025 या पाच महिन्यांत परिमंडळ तीन हद्दीत एकूण 91 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. याशिवाय 100 हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील गुन्हेगार:
1.शरद ज्ञानेश्वर मोरे (वय 27, मूळ गाव – मुळशी) – 2 वर्षांसाठी तडीपार
2.स्वयम सबाजी सावंत (वय 27) – 1 वर्षासाठी तडीपार
3.सोनू बहिरू केदारी (वय 29, खेड) – 1 वर्षासाठी तडीपार
भोसरी एमआयडीसी परिसरातील गुन्हेगार (टोळी):
4.गणेश संतोष कोठावळे उर्फ जीके (वय 19, चिखली) – 2 वर्षे
5.प्रतीक कैलास गजरमल उर्फ ससा (वय 19, चिंचवड)
6.रोहित राजू बजलव (चिखली)
7.विशाल हनुमंत पोळ उर्फ व्हीपी (वय 21, चिखली)
8.दिग्विजय अनंत गायकवाड उर्फ बच्चा (वय 19, चिंचवड)
वरील सर्वांवर गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे असून, प्रत्येकास 2 वर्षांसाठी तडीपार.
भोसरीतील इतर गुन्हेगार:
9.केतन सोनवणे उर्फ चेप्या (वय 26, पिंपरी) – 2 वर्षे
10.सचिन बाळू धांडे (वय 20) – 2 वर्षे
11.दीपक गोरख धांडे (वय 24) – 2 वर्षे
12.राहुल भारत जाधव (वय 20) – 2 वर्षे
13.विजय बाळासाहेब साळवे (वय 22, मोशी) – 1 वर्ष
14.ज्ञानेश्वर वसंत दुनघव (वय 22) – 1 वर्ष
चाकण पोलीस ठाणे परिसर:
15.नंदा रंगनाथ साळुंके (वय 50) – 2 वर्षे
गांजा विक्रीसंबंधी 4 गुन्हे दाखल आहेत.
चिखली परिसरातील गुन्हेगार:
16.आकाश उर्फ सुमीत उर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहळ (वय 19) – 2 वर्षे
17.संग्राम दत्तात्रय पवार (वय 29) – 2 वर्षे
18.सुमीत गणेश पिल्ले (वय 32) – 2 वर्षे
19.कनिष्काराज उर्फ राणा अरुण सुरवसे (वय 21) – 2 वर्षे
20.कुणाल बाळकृष्ण भंडारी (वय 23, मोईगाव, खेड) – 2 वर्षे
21.तेजस नीलेश गायकवाड (वय 20) – 1 वर्ष
22.रोहन शंकर पंडित (वय 23, चिखली) – 1 वर्ष
इतर तडीपार:
23.मारुती मांजरीया राठोड (वय 45, निगडी) – 1 वर्षासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून तडीपार
दिघी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार:
24.गजानन गोविंद भोसले (वय 28, लोहगाव, पुणे) – 2 वर्षे
25.जयंता हरिपद सरकार (वय 29, दिघी) – 2 वर्षे
26.अक्षय नंदू पठारे (वय 20, चऱ्होली) – 2 वर्षे



