Pune Spa Sex Racket Busted | विमानतळ : ‘मेंशन स्पा’ हाई प्रोफाईल सेक्स रॅकेट सूत्रधार रहीम-अमित पडद्याआड ?
mansion spa sex racket busted by pune police

- Pune Spa Sex Racket Busted | परिमंडळ-४ हद्दीतून एकाचवेळी तब्बल १८ मुलींची सुटका
पुणे, दि. १० जुलै, महाराष्ट्र मिरर :
मुबारक जिनेरी
विमानतळ येथील उच्चभ्रू भागातील हाई प्रोफाईल सेक्स रॅकेट पुणे पोलिसांनी मोडून काढले आहे. स्पाच्या नावाखाली चालणारे सेक्स उघडकीस आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असला तरी ‘मेंशन स्पा’ हाई प्रोफाईल सेक्स रॅकेट सूत्रधार रहीम-अमित अद्याप पडद्याआड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Pune Spa Sex Racket Busted

परदेशी तरुणी आढळल्याने खळबळ
मेंशन स्पा सेंटर येथे पोलिसांनी अचानक छापा कारवाई केली असता येथे परदेशी तरुणींची मोठ्या प्रमाणावर सुटका करण्यात आली. परदेशी तरुणींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणारे खरे सूत्रधार कोण याची माहिती पोलीस प्रशासनाकडून गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. Pune Spa Sex Racket Busted, Pune Crime News
याप्रकरणी पोलीस हवालदार राकेश चांदेकर यांनी फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी स्पा मॅनेजर कुणाल दत्तात्रय घोडके, रा.हडपसर, जुनैद शेख व सुनील चव्हाण यांच्याविरुद्ध गुरन. ३२८/२०२५ बीएनएस कलम १४३ (३), ३ (५) व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
स्पा सेंटरच्या आड सुरु असलेल्या हाई प्रोफाईल वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर करपे, उपनिरीक्षक नितीन राठोड, अक्षय सोनवणे व पथकाने कारवाई तब्बल १ लाख ४० हजार रुपयांचा मुड्डेमाल जप्त करण्यात आला. Pune Spa Sex Racket Busted, Pune Crime News



