क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News | हिरेजडित दागिने व लाखो रुपये चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद : गुन्हे शाखा युनिट -१

  • Pune Crime News | वपोनि शब्बीर शेख व पथकाकडून ४८ तासात आरोपी जेरबंद
  • चोरट्याकडून तब्बल १८ लाखांचा ऐवज जप्त

पुणे, दि. १३ जुलै, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर)

कर्वे रोड (Karve Road) येथे घरफोडी करून हिरेजडित दागिने व लाखो रुपये चोरी करणाऱ्या अट्टल चोरास पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून ४८ तासात जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे DCP Amol Zende, सपोआ गणेश इंगळे ACP Ganesh Ingale यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि शब्बीर सय्यद Sr.Pi. Shabbir Sayyad व Unit-1 पथकाने सदर कामगिरी केली आहे.

अट्टल चोरटा अल्लाबक्ष महंमद पिरजादे, वय ३५, रा. रेल्वे भराव, २१७ मंगळवार पेठ पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कर्वे रोड येथील घरफोडीचा समांतर तपास करीत असताना युनिट-१ कडील पोलीस अंमलदार निलेश साबळे PC Nilesh Sabale व दत्ता सोनावणे PC Datta Sonvane यांनी सदरची घरफोडी करणारा इसम हा घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी नामे अल्लाबक्ष पिरजादे, रा.२१७ मंगळवार पेठ, पुणे हा असल्याचे लक्षात आले. वरिष्ठांचे आदेशाने युनिट-१ चे सर्व पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरू करुन त्याचे रहाते घराजवळ कोंबडीपुल शिवाजी आखाडाजवळ मंगळवार पेठ पुणे येथे सापळा रचुन दबा धरुन थांबले. सदर आरोपी हा कोंबडीपुल शिवाजी आखाडाजवळ मंगळवार पेठ पुणे येथे पोलिसांना बघून पळु लागल्याने त्याचा पाठलाग करत त्यास ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडे मुद्देमालाची चौकशी केली असता त्याने पुणे मनपा पी.एम.टी डेपो शिवाजीनगर पुणे येथील मेट्रो स्टेशन जिन्याचे लगत नदी पात्रात कंपाउंड लगत एका दगडाखाली ठेवल्याचे सांगितले. आरोपीला सोबत घेत पोलिसांनी सदर ठिकाणी जावून पिशवीमध्ये वेगवेगळ्या वर्णनाचे १७,६४,०६०/-रु किं.चे दाखल गुन्ह्यातील २० तोळे वजनाचे हिरेजडीत सोन्याचे दागीने व ८०००/- रु. रोख रक्कम असा एकुण १७,७२,०६०/-रु. किं.चा माल ताब्यात घेतला. आरोपीस पुढील कारवाईकामी डेक्कन पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

to watch vedio click here

https://www.instagram.com/reel/C9XbDe4op10/?igsh=MXVycXdoc2R3b285cw==

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, Pune Police पुणे शहर, अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ०१, शब्बीर सय्यद सहा. पो. निरी आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार निलेश साबळे, दत्ता सोनवणे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, महेश बामगुडे, आण्णा माने, राहुल मखरे, अय्याज दड्डीकर, प्रफुल शेलार, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0