Pune Crime News | मार्बल दुकानामध्ये ३ लाख रुपयांची चोरी करणारा अटकेत : नांदेड सिटी पोलिसांची कामगिरी

- चोरटा निघाला मार्बल व्यावसायिक | Pune Crime News
पुणे, दि. २२ मे, महाराष्ट्र मिरर (मुबारक जिनेरी)
Pune Crime News | मार्बल खरेदीचा बहाणा करून ३ लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या चोरट्याला नांदेड सिटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरटा मार्बल व्यावसायीक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने सारेच अवाक झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. १७ मे रोजी मायरा ग्रेनाईट अँड टाईल्स् नांदेड फाटा येथे दुकानातील ३ लाख रुपये रोख चोरी झाली होती. याबाबत फिर्यादी भगवान जगदीश पारिक, आंबेगाव बु, पुणे यांनी तक्रार दिली होती. नांदेडसिटी पोलीस स्टेशन Nanded City Police गु.र.नं. 88/2025 भारतीय न्याय संहीता कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे अनुषंगाने अतुल भोस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नांदेडसिटी पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशन तपास पथकातील पो.शि. स्वप्नील मगर, शिवा क्षीससागर, पुरुषोत्तम गुन्ला, राजु वेंगरे व योगेश झेंडे यांनी घटनास्थळी व आजू बाजुस मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध लावला. आरोपी राहुल तुकाराम वाशिवले, वय 37 वर्षे रा. वैष्णवी कॉम्प्लेक्स फ्लॅट नं. 101 वंडरसिटी जवळ कात्रज पुणे याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीचे पुर्वी नऱ्हे पुणे येथे मार्बलचे दुकान असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. .आरोपीस मार्बल व्यवसायाबाबत संपुर्ण माहिती असल्याने त्याने मार्बल दुकानामध्ये चोरी केल्याचे सांगीतले आहे. नमुद आरोपीकडून चोरीस गेलेल्या रक्कम पैकी 1,58,000/- रुपये जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, राजेंद्र बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 3 पुणे, संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, पोलीस उप निरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार – स्वप्नील मगर, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, शिवा क्षीससागर, राजु वेंगरे, भिमराज गागुर्डे, मोहन मिसाळ, प्रशांत काकडे यांच्या पथकाने केली आहे. Pune Crime News



