Pune Crime News | नागालँन्डच्या विद्यार्थ्यांची सुस-पाषाण टेकडीवर लूटमार करणाऱ्या आरोपींना बेड्या
Senior Police Inspector Mahesh Bolkotgi in Action
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व चतुःशृंगी तपास पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी
- Pune Crime News
पुणे, दि. ७ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Pune Crime News | स्पायसर महाविद्यालयात (Spysar College) शिक्षण घेणारे नागालँड राज्यातील विद्यार्थी संध्याकाळी सायकल ट्रेकींगसाठी सुस-पाषाण (Sus-Pashan) टेकडीवर गेले असता चौघांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांची लूटमार केली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Police Inspector Mahesh Bolkotgi) यांनी तपासाची गतिमान चक्रे फिरवून आरोपींना जेरबंद केले आहे.
संशयित आरोपी १) अजिंक्य अशोक बोबडे, वय-१८ वर्ष, रा-गुरुकृपा बिल्डींग, दुसरा मजला, रुम नं.०३, संततुकाराम नगर वाघजाई चौकाजवळ, नवी सांगवी पुणे. २) निखील बाबासाहेब डोंगरे, वय १८ वर्ष, रा-साकेत सोसायटी, आंबेडकर चौक, डी.पी. रोड औंध, पुणे.यांना जेरबंद करण्यात आले आहे. तर दोन विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. २८/०९/२०२४ रोजी ७.३० चे सुमारास सुस-पाषाण टेकडी पुणे येथे स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे नागालँड राज्यातील फिर्यादी पॉजेंदाई कामेई, वय १९ वर्षे व त्यांचा मित्र नामे राकेश रॉय असे सायकलींग ट्रॅकींगकामी गेले होते. यावेळी ४ अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादी यांना त्यांचा मित्र यांना कोयत्याचा धाक दाखवुन व कोयत्याने मारहाण करुन त्यांचेकडुन दोन मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकुण-२०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जबरदस्तीने काढुन घेवुन चोरी करुन नेला होता. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. ७७७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३११,३५१(३), ३५२, ३(५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम-३७ (१) (३), सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तपास पथकाला गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यावेळी तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी आरोपीची गोपनीय माहिती खबऱ्यांकडून प्राप्त करुन आरोपी अजिंक्य अशोक बोबडे, निखील बाबासाहेब डोंगरे व ०२ विधीसंघर्षीत बालक यांचा शोध त्यांना शिताफीतीने ताब्यात घेतले. यावेळी चोरुन नेलेला मुद्देमाल व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा एकुण-०१,२१,२००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन उत्तम कामगिरी केली आहे.
तसेच सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०४ हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयानंद पाटील तपास पथकाचे अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार बाबुलाल तांदळे, पोलीस हवालदार सुधाकर माने, पोलीस हवालदार इरफान मोमीन, पोलीस हवालदार बाबासाहेब दांगडे, पोलीस हवालदार श्रीधर शिर्के, पोलीस हवालदार किशारे दुशिंग, पोलीस हवालदार संदिप दुर्गे, पोलीस हवालदार विशाल शिर्के, पोलीस अंमलदार बाबासाहेब भांगले, पोलीस अंमलदार प्रदिप खरात, पोलीस अंमलदार श्रीकांत साबळे, पोलीस अंमलदार प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.