Pune Crime News | गँगस्टर टिपू पठाण टोळीकडून इमरान शेख यांना ठार मारण्याची धमकी ! पुणे शहरात गुंडांचा धुमाकूळ
- टोळीतील तनवीर शेख याच्याविरुद्ध तक्रार दाखल
पुणे, दि. ३० नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर
Crime Editor वि.रा. जगताप,
काँग्रेसचे शहर संघटक व सामाजिक कार्यकर्ते इमरान शेख (Imran Shaikh) यांना निवडणुकीत उभे राहायचे असल्यास १० लाखांची खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गँगस्टर टिपू पठाण (Gangster Tipu Pathan) टोळीचा तनवीर शेख याच्याकडून धमकी मिळाल्याची तक्रार काळेपडल पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. Pune Crime News
तनवीर शेख याने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहायचे असल्यास 10 लाख रुपये खंडणीची (Extortion) मागणी केली असून, ती रक्कम न दिल्यास खुन (Murder Threat) करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप इमरान शेख यांनी केला आहे.
सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे ओळखले जाणारे इमरान शेख यांच्या नेतृत्वाला मिळालेल्या या धमकीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इमरान शेख यांनी शांततेचे आवाहन करत सांगितले की, “पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, झोनल डीसीपी, आणि काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मला नक्कीच न्याय देतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, दोषींवर त्वरीत कारवाई करून त्यांना कठोर शिक्षेसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. इमरान शेख यांनी असेही स्पष्ट केले की, अशा धमक्यांना घाबरून त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य थांबणार नाही
गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध झालेल्या सय्यद नगर-हांडेवाडी रोड भागात गुंडानी थैमान घातल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडांच्या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.