क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Vasai Kidnapping News : वसईतून तीन वर्षांच्या चिमुकल्याची अपहरण, पोलिसांनी तपासात आरोपी महिलेला बेड्या

Vasai Kidnapping News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या मांडवी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. अपहरण झालेल्या बालकाची सुटका केली.

वसई :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या मांडवी पोलीसांनी दमदार कामगिरी केली आहे. अपहरणाच्या प्रकरणाचा छडा लावत मांडवी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी तीन वर्षांच्या चिमुकल्याची सुटका केली. Three-year-old girl kidnapped from Vasai मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेत ही महिला नालंदा बिहार राज्यात असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी महिलेला अटक केली तर चिमुकलीला तिच्या आईकडे सोपवलं. Vasai Virar Latest Crime News

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नबीबउल्लाह हमीदउल्लाह चौधरी (38 वय) राहणारे नालेश्वरनगर प्राप्ती हॉटेलच्या जवळ वसई येथे तीन महिन्याच्या मुलास मेहुण्याची पत्नी किताबुननिशा हिने खेळण्यासाठी बाहेर घेऊन जाते असे सांगून लहान मुलाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात मांडवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी आरोपी महिलेच्या शोधासाठी पथके सज्ज केली. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसळे आणि गणेश प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत त्यांच्या पथकाला आरोपी महिलाही नालंदा बिहार राज्यात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ बिहार राज्यघाटून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अपहरण केलेल्या बालकासह आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

आरोपी महिलेचे सरमेरा, जि. नालंदा रा. बिहार येथील एका पुरुषाबरोबर प्रेम संबंध होते. आरोपी महिलेला तीच्या प्रियकरासोबत नव्याने संसार करावयाचा होता म्हणून तीने लग्न झाल्याची तीन अपत्याची माहिती प्रियकरास सांगीतली नव्हती. आरोपी‌ महिलेने प्रेम संबंधातून ती तीचे प्रियकरापासून गरोदर असल्याची खोटी माहिती प्रियकरास फोनद्वारे कळचित असायची, आरोपीत महिलेच्या नणंदेचे 3 महिन्यांचे बालक हे तीचे व तीच्या प्रियकराचेच असल्याचे प्रियकरास व्हिडीओ कॉलद्वारे भासवात असायची.

आरोपी हिला प्रियकरासोबत नव्याने संसार करण्याची इच्छा असल्याने सदर उद्देश साध्य करण्यासाठी तीच्या नणंदेच्या 03 महिन्यांच्या लहान बालकाचे अपहरण करून सदर बालकासह ती तीचे प्रियकराकडे नालंदा, राज्य बिहार येथे निघून गेलेली होती. अशी माहिती आरोपी महिलेने दिली आहे. पुढील तपास मांडवी पोलीस ठाण्याचे Mandavi Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मुसळे हे करीत आहेत.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, जयंत बजबळे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-3 विरार, बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग, संजय हजारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शरद सुर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनात मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मुसळे, संदिप सावंत, पोलीस हवालदार राजेंद्र फड, नितीन गलांडे, पोलीस शिपाई गजानन गरीबे, विशाल भगत,जगदिश नाणेकर, अमोल साळुंखे, महिला पोलीस शिपाई शितल बिराजदार यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0