Pune Crime News : इराणी चोरास पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केले जेरबंद
•कोंढवा पोलिसांचे कामगिरी ; सीसीटीव्हीच्या मदतीने मोबाईल चोराला अटक, आरोपी हा इराणी असल्याचे तपासात निष्पन्न
पुणे :– सांगरिया सोसायटी दोराबाजी मॉल जवळ अविनाशसिंग शैलेंद्रसिंग चौहान हे मॉर्निंग वॉकला गेले असताना 11 मे च्या सकाळी सहा वाजता घरापासून मॉर्निंग वॉक करत असताना मोबाईलवर गाणी ऐकत असताना अज्ञात व्यक्ती बाईकवरून येऊन त्यांच्या हातात दिले मोबाईल फोन हिसकावून तिथून पसरला झाला होता. या संदर्भात चौहान यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली कोंडवा पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटने वापस गांभीर्य लक्षात घेताच एक पथक तयार केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाची शिंदे पोलिसा अंमलदार हवालदार यांचे एक पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली आणि आजूबाजूचे परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसांनी चेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये जवळपास 70 ते 80 सीटसीटीव्ही फुटेज चेक करून गुन्ह्यातील आरोपीचा पोलिसांना ओळख पडली. पोलिसांनी आरोपीची खबऱ्याद्वारे ठाऊकठिकाणी बाबत व तो नेहमी वावरत असलेल्या ठिकाणाबाबत माहिती भेटली. आरोपी हा सायंकाळी चहा पिण्यासाठी व मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना खात्रीदायक माहिती मिळाली होती. 20 मे ला पोलिसांनी हांडेवाडी चौकात सापळा रचून रात्री आठच्या सुमारास पांढ-या, ग्रे, पिवळ्या रंगाचा लायनिंग शर्ट घालुन आलेला दिसला. त्याबाबत बातमीदाराने अंगुली निर्देश करुन दाखविले असता त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेणेकामी गेलो असता त्याला आमचा सुगावा लागला असता तो पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा त्यास स्टाफच्या मदतीने पाठलाग करुन ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने हादीहासन सर्फराज इराणी, (23 वर्ष), (रा.न्यु बिल्डींग, भारत पेट्रोल पंप शेजारी,) आंब्याच्या झाडाच्या जवळ हांडेवाडी रोड, हडपसर पुणे असे सांगितले. तेव्हा त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत चोरी केलेला आयफोन मोबाईल फोन मिळुन आला आहे. मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बालाजी डिगोळे हे करित आहे.
अमितेश कुमार पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.05, गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार / हवालदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, विकास मरगळे,शशांक खाडे,अक्षय शेंडगे,अभिजीत रत्नपारखी, अभिजीत जाधव, सुहास मोरे, राहुल थोरात यांनी केली आहे