Pune Crime News | अनैतिक संबंधातून निर्घृण खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळणारा आरोपी खडकी पोलिसांकडून जेरबंद
Pune Crime News | खडकी पोलिसांकडून कौशल्यपूर्ण तपास : तांत्रिक विश्लेषणाद्वारे खुन्याचा तपास
पुणे, दि. १९ मार्च, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News | Heinous murder due to immoral relationship, accused of burning body to destroy evidence, arrested by Khadki police
पूर्ववैमनस्यातुन व अनैतिक संबंधातून निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून खडकी ब्रिजच्या खाली मुळा नदीच्या पात्रात जलपर्णीमध्ये फेकून देणाऱ्या संशयित मारेकऱ्याला काही तासातच गजाआड करण्यात आले आहे. खडकी पोलीस ठाण्याचे वपोनि गिरीशकुमार दिघावकर Sr.Pi. Girishkumar Dighavkar व तपास पथकाने कौशल्यपूर्ण तांत्रिक विश्लेषणाद्वारे बेवारस मृतदेहाची ओळख निष्पन्न करत मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. Pune Crime News
मयताचे नाव विजय राजु धोत्रे, वय ३३ वर्षे, रा. बॉम्बे शॉपर्स, येरवडा, पुणे असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
तर संशयित आरोपी सुधीर साहेबराव जाधव, वय ३२ वर्षे, रा. विश्रांतवाडी पुणे यास धानोरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. १७ रोजी नवीन खडकी ब्रीज च्या खाली मुळा नदीच्या पात्रात जलपर्णी मध्ये बेवारस मृतदेह सापडून आल्याने खळबळ उडाली होते. याबाबत अज्ञात इसमाचे विरुध्द खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १०१/२०२४ भा.द.वि. कलम. ३०२,२०१ दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषांनगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ, श्रे. पोउपनिरी तानाजी कांबळे, पो. हवा. कलंदर, पो.ना. निकाळजे, पो.शि.अतुल इंगळे, पो.शि. अनिकेत भोसले, पो.शि. ऋषिकेश दिघे असे सदर घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळाची बारकाईने निरीक्षण केले असता एक चिठी मिळुन आली होती.
मयत व आरोपीताबाबत प्राप्त बातमीच्या आधारे व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या व घटनास्थळावर मिळुन आलेल्या चिट्टीच्या आधारे यातील मयत इसमाचा खडकी, विश्रांतवाडी, येरवडा, या पोलीस ठाणे हद्दीत शोध घेण्यात आला. दरम्यान मयत इसम हा बॉम्बे शॉपर्स, येरवडा, पुणे येथील रहीवाशी असल्याचे माहीती मिळाली. नातेवाईकांनी सदर मयत इसमांस त्याचे पायाच्या कुरुपावरुन ओळखुन मयताचे नाव विजय राजु धोत्रे, वय ३३ वर्षे, रा. बॉम्बे शॉपर्स, येरवडा, पुणे असल्याचे सांगितले. दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपीचा सी.सी.टी.व्ही. फुटेज व बातमीदारामार्फत बातमी प्राप्त केले. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दोन वेगळी पथके करुन सदर आरोपीचा खडकी, येरवडा, विश्रांतवाडी या परिसरात आरोपीचा शोध घेवुन सापळा लावुन शिताफिने आरोपीस धानोरी परिसरातून आरोपी नामे, सुधीर साहेबराव जाधव, वय ३२ वर्षे, रा. विश्रांतवाडी पुणे यास ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी व त्याचे साथिदार यांनी जुन्या भांडणाच्या कारणांवरुन व अनैतिक संबधातुन सदरचा खुन केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले असुन त्याचे साथिदाराचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त Pune Police CP Amitesh Kumar, पुणे शहर, प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त, Jt.CP. Pravin Pawar पुणे शहर, मनोजकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, विजयकुमार मगर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०४, पुणे शहर, आरती बनसोडे, ACP Aarti Bansode सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गिरीशकुमार दिघावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहा पोलीस निरीक्षक सुहास पाटील, सहा पोलीस निरीक्षक किरण देशमुख, पोलीस उप निरीक्षक, आण्णा गुंजाळ, परि पोलीस उप निरीक्षक दिग्विजय चौगुले, श्रे. पोउपनिरी तानाजी कांबळे, पो. हवा. कलंदर, पो.ना. निकाळजे, पो.शि. अतुल इंगळे, पो.शि. अनिकेत भोसले, पो.शि. ऋषिकेश दिधे यांनी केलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास गिरीशकुमार दिघावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.