Letter From Prakash Ambedkar To Mallikarjun Kharge : प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र
•प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी कडून काँग्रेसच्या सात जागांना महाराष्ट्रात पूर्णपणे पाठिंबा
मुंबई :- महाविकास आघाडीत वंचित गटाला सामील करून घ्या त्याकरिता भाविकास आघाडी कडून सातत्याने वंचित आघाडीकडे विविध प्रस्ताव पाठवले होते परंतु आज वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला महाराष्ट्रात सात जागा यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे काँग्रेस सांगेल त्या सात जागांवर पूर्णपणे पाठिंबा देईल असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे जाई निर्णय सांगितल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संध्याकाळी सात पर्यंत महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेले टाईम लाईन त्यात पूर्वी त्यांनी पत्र लिहून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे पत्र
मल्लिकार्जुन खर्गे,
17 मार्च रोजी मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समपन महासमारंभात तुम्हाला आणि श्री राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आम्ही विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी असंख्य MVA बैठकीत VBA च्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आणि MVA मध्ये VBA बद्दलच्या असमान वृत्तीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा हाच फॅसिस्ट, फुटीरतावादी, अलोकतांत्रिक भाजपा-आरएसएस सरकारचा आहे. या विचाराने मी महाराष्ट्रातील 7 जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला VBA चा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मी तुम्हाला विनंती करतो की मला MVA मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची नावे द्या. आमचा पक्ष तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना पूर्ण मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देईल.
वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमाची प्रतिक्रिया देताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस मदतीचा जो हात दिलाय त्याबाबत निश्चित त्यांचे धन्यवाद करतो परंतु प्रकाश आंबेडकर लवकरच फेर विचार करून महाविकास आघाडीचा घटक पक्ष राहील असे इच्छा त्यांनी व्यक्त केले आहे लवकरच सकारात्मक भूमिका घेऊन लोकसभेच्या जागे संदर्भात आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावात फेरविचार करून लवकरच त्यांना सन्मान स्थान अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षाने ते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.