क्राईम न्यूज

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी, येरवडा येथील गुंडास बेड्या

  • क्रियेटीसिटी मॉल येरवडा येथे फर्निचर कंपनीकडे मागितली होती खंडणी

पुणे, दि. ६ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News | Extortion in the name of Mathadi, Gundas Bedya from Yerwada

माथाडीच्या नावाखाली क्रियेटीसिटी मॉल येरवडा (CREATICITY MALL YERWADA) येथील वुडन स्ट्रीट फर्निचर कंपनीच्या प्रतिनिधींना बेकायदेशीर पैशाची मागणी करणाऱ्या गुन्हेगारावर खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell, Crime Branch) कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. Pune Crime News

शेखर मारुती लोंढे, वय ३७ वर्षे, रा. नागपुर चाळ, जुना जकात नाक्याच्या पाठीमागे, नागपुरचाळ पोलीस चौकी समोर, येरवडा, पुणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune Crime News

वुडन स्ट्रीट फर्निचर प्रा. लि. क्रियेटीसिटी मॉल, येरवडा या कंपनीचे तक्रारदार यांना इसम नामे शेखर मारुती लोंढे हा माथाडीच्या नावाखाली वेअर हाऊस वरुन फर्निचर मटेरीयल घेवुन आलेल्या ट्रक मधील फर्निचर फिर्यादी यांचे कामगारांना खाली करु न देता आडवणूक करुन, आम्ही येथील स्थानिक आहोत असे सांगुन फिर्यादी यांचेकडे प्रति महिना १८ हजार रुपये व कंपनीचे हाऊसकिंपींग तसेच लेबरचे कॅन्ट्रक्ट स्वतः ला देण्याकरीता जीवे ठार मारण्याची धमकी होता. याबाबत तक्रार खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडे प्राप्त झाली होती.

आरोपी नामे शेखर मारुती लोंढे यांचेकडे नमूद कंपनीची माथाडी संदर्भात कोणतीही वर्क ऑर्डर नव्हती तसेच तो माथाडी बोर्ड या ठिकाणी नोंदीत कामगार नसताना माथाडीच्या नावाखाली धमकावत होता. यापुर्वी देखील आरोपीने तक्रारदार यांचेकडून धमकी देवुन १२ हजार रुपये स्वीकारल्याचे समोर आले होते. आरोपी शेखर मारुती लोंढे याचेविरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १२७/२०२४ भा.दं.वि. कलम ३८६,३८७ अन्वये दिनांक ०५/०३/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी शेखर मारुती लोंढे हा सध्या पोलीस कस्टडीत आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, चेतन चव्हाण, चेतन शिरोळकर यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0