क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News | कोंबडी पूलावर पिस्तूल घेऊन थांबला आणि गुन्हे शाखेने …

  • सपोआ गणेश इंगळे व वपोनि शैलेश संखे यांची धडाकेबाज कामगिरी
  • आरोपींकडून २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त

पुणे, दि. १४ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर (Mubarak Jineri) : Pune Crime News

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने धडाकेबाज कामगिरी करत मंगळवार पेठ, कोंबडी पूलावर पिस्तूल घेऊन थांबलेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. सपोआ १ गणेश इंगळे ACP 1 Ganesh Ingale यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ वपोनि शैलेश संखे Sr.Pi. Shailesh Sankhe व त्यांच्या पथकाकडून सदर कामगिरी करण्यात आली आहे. कारवाईत आरोपींकडून २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

खंडणी विरोधी पथक १ अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोशि/८८०२ मयूर भोकरे व पोहवा/६७८२ अमोल आवाड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम कोंबडी पुल, मंगळवार पेठ पुणे येथे पिस्टल बाळगून थांबला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयित इसम बॉबी भागवत सुरवसे, वय २८ वर्षे, रा. सर्वे नं १२, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे यास ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला पाठीमागे १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस मिळून आल्याने सदर आरोपी विरूद्ध फरासखाना पो स्टे गु.र.नं. १६२/२०२४ आर्म अॅक्ट ३ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने त्याच्याकडील आणखी १ पिस्टल व २ जिवंत काडतुसे वैभव कोलते रा. पिसर्वे, ता. पुरंदर, जि पुणे यास विकले असल्याचे समजल्याने इसम नामे वैभव चंद्रकांत कोलते, वय ३२ वर्षे, रा. मु पो पिसर्वे, ता. पुरंदर, जि. पुणे याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. दोन्ही आरोर्पीना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अभिजीत पाटील, खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर हे करत आहेत. Pune Police

सदरची कारवाई शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त १. गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सपोनि अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार मयुर भोकरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, रविंद्र फुलपगारे, मधूकर तुपसौंदर, प्रविण ढमाळ, गितांजली जांभुळकर यांनी कारवाई केली आहे.

Pune Crime News | Chicken stopped on the bridge with a pistol and the Crime Branch…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0