Bhiwandi Crime News : भिवंडीत मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; 5.90 लाखांचे 30 मोबाईल जप्त, 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस
•भिवंडी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरविलेले 25 मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश, एकूण 55 मोबाईल फोन हस्तगत
भिवंडी :- भिवंडीच्या परिमंडळ 2 हद्दीत घरफोडी, मोबाईल फोन चोरी, गाड्यांची चोरी यांसारख्या घटना सातत्याने वाढत असल्याने पोलीस आयुक्त यांनी या सगळ्या घटनेला आळा घालण्याकरिता कारवाई करण्याचे निर्देश दिले. परिमंडळ 2 भिवंडी , गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी एक पथक तयार केले. पथकाने कारवाई करत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सराईत आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले होते. गुन्हे शाखा कक्ष-2 भिवंडी यांना विश्वासनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नावेद अन्सारी चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी खडक रोड हाफीजी बाबा दगर्याजवळ निजामपूर भिवंडी येथे सापळा रचून नावेद मुसफिर अन्सारी (29 वर्ष,रा. खंडूपाडा रोड भिवंडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या जवळील एक्टिवा स्कूटर आणि 30 मोबाईल फोन असा एकूण पाच लाख 90 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भिवंडी निजामपुरा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 30 मोबाईल फोन पैकी 13 मोबाईल फोनचा शोध घेतला असून आरोपीच्या विरोधात असलेल्या विविध घरफोडी सात गुन्हे उघडकी आणण्यास पोलिसांना यश आले आहे. तर पोलिसांकडून 17 मोबाईल फोनच्या चोरीबाबत माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून चालू आहे. आरोपीकडून अजुन फोन चोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
परिमंडळ 2 भिवंडी मधील विविध पोलीस ठाण्यात मोबाईल फोन गहाळ झालेल्या तक्रारींची माहिती संकलीत करण्यात आली. त्यानंतर माहितीवरून गहाळ झालेले मोबाईल फोन सी.ई.आय. आर. पोर्टल द्वारे तसेच गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या आय.एम.ई.आय. कमाकांची माहिती सर्व्हस प्रोव्हायडरकडुन प्राप्त करून 3.75 लाख किंमतीचे एकुण 25 मोबाईल फोन शोधण्यात आले आहेत. मोबाईल फोन त्यांचे मुळ मालकांना देण्यात येत आहेत.
पोलीस पथक
गुन्हे शाखा, घटक 2, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, श्रीराज माळी, पोलीस उपनिरीक्षक निसार तडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश शिंदे, पोलीस हवालदार अमोल देसाई, शशिकांत यादव, मंगेश शिर्के, सचिन साळवी, राजेंद्र राठोड, सचिन जाधव, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, नितीन बैसाणे यांनी केली आहे.