पुणेक्राईम न्यूज

Pune Crime News : खुनातील आरोपी 1 तासात गजाआड : मुंढवा पोलीसांची तत्परतेने कारवाई

•Pune Crime News मामे भावाने घेतला जीव, आरोपीला एक तासात पोलिसांनी केले गजाआड

पुणे :- मुंढवा असलेल्या आनंदनिवास कामगार मैदान जवळ अर्धवट बांधकाम चालू असलेल्या जखमी अवस्थेत व्यक्ती पडला आहे असा कॉल नियंत्रण कक्ष येथे आला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेण्यास सुरुवात केली. जखमी व्यक्तीला ताबडतोब औषध उपचाराकरिता ॲम्बुलन्समध्ये टाकून ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यादरम्यान जखमी व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव श्रीकांत निवृत्ती अल्हाट (42 वर्ष) आहे. श्रीकांत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी पोस्टमार्टम दरम्यान श्रीकांत यांच्या डोक्याला आणि अंगावर जखमा झाली आहे असं डॉक्टरांच्या अहवाला स्पष्ट झाले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या गोपनीय माहिती द्वारे तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्रीकांत यांचे नाव जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मामेभाऊ राकेश तुकाराम गायकवाड यांच्याकडे पाणी मागण्यासाठी गेले असता रात्री वादावादी झाल्यानंतर राकेश यांनी श्रीकांत सिमेंटच्या दगडाने आणि लोखंडी हत्याराने श्रीकांत याच्यावर प्राण घातक हल्ला केला यात तो जबर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला केवळ एक तासात अटक केली असून श्रीकांत त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून मुंढवा पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून पोलिसांनी राकेश तुकाराम गायकवाड यांच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे शहर, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर,अपर पोलीस आयुक्त, प्रविण पाटील, पश्चिम प्रादेशिक विभाग अतिरिक्त कार्यभार पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, यांचे सुचना प्रमाणे, पोलीस उप आयुक्त, आर राजा, परिमंडळ-5, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर. राजा परिमंडळ 5 पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक अनिल बिनवडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे पोलीस उप निरीक्षक शुभांगी मगदुम, पोलीस अंमलदार संतोष जगताप, तुळशीराम रासकर, दिनेश भांदुर्गे, राजु कदम, दत्ताराम जाधव, रविंद्र देवढे, योगेश गायकवाड, जगदिश महानोर, किरण बनसोडे, राहुल मोरे, सचिन पाटिल, स्वनिल रासकर निलेश पालवे, दयानंद गायकवाड, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0