Uncategorizedक्राईम न्यूज

Pune Crime News | चोरी, पास्को, खुनाचा प्रयत्न असे १२ गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या विधिसंघर्षितकडून २ दुचाकी, ७ मोबाईल जप्त : गुन्हे शाखा युनिट-३ कडून कारवाई

Pune Crime News | 2 bikes, 7 mobiles seized from law-enforcement accused of 12 serious crimes like theft, pasco, attempt to murder: Action taken by Crime Branch Unit-3

पुणे, दि. ७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News

वय वर्ष १७ आणि चोरी, पास्को, खुनाचा प्रयत्न असे १२ गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या विधिसंघर्षितकडून २ दुचाकी, ७ मोबाईल जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट-३ ला यश आले आहे. पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. १० गुन्ह्यापैकी ३ गुन्ह्यात अल्पवयीन आरोपींचा सह्भाग चिंतेचा विषय ठरत आहे. सदर कारवाई गुन्हे उपायुक्त निखिल पिंगळे Crime DCP Nikhil Pingale, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे ACP Ganesh Ingale यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार Sr.Pi. Rangrao Pawar व पथकाकडून करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा, युनिट ३ कडील पोलीस अंमलदार हे वारजे माळवाडी व उत्तमनगर पोलीस ठाणे हद्दित अवैध धंदयांवरकारवाई करणेकरीता पेट्रोलींगकरीत असताना युनिट ३ कडील पोलीस शिपाई प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली की, विधीसंघर्षीत बालकाकडे चोरीची दुचाकी व चोरीचे मोबाईल हॅन्डसेट असून तो विक्रीकरीता आला असल्याची माहिती मिळाली. सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवून त्याचेकडून ०१ सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेड व ०७ मोबाईल हॅन्डसेट मिळून आले. नमुद विधीसंघर्षीत बालकास विश्वासात घेवून केले तपासात त्याने आणखी एक केटिएम आर सी १५ ही दुचाकी चोरी केली असल्याचे सांगीतल्याने ती त्याचेकडून हस्तगत करण्यात आलेली आहे. विधीसंघर्षीत बालकाकडे मिळून आलेल्या दुचाकी व मोबाईल हॅन्डसेटबाबत तपास करता सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेडबाबत चिखली पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुन्हा रजि. नंबर ५०३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे तसेच केटिएम आर सी १५ बाबत सिंहगड रोड पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नंबर १२५/२०२४ भादंविक ३७९ तसेच मिळाले मोबाईल हॅन्डसेटपैकी एक मोबाईल हॅन्डसेट हे उत्तमनगर पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि. नंबर १११/२०२४ भादंविक ३८० प्रमाणे असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. उर्वरीत मोबाईल हॅन्डसेटबाबत तपास सुरू आहे. त्याचेकडुन एकुण १,६०,०००/-रु. किंमतीचा माल जप्त केला आहे. विधीसंघर्षीत बालकास पुढिल कारवाईकामी उत्तमनगर पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.

विधीसंघर्षीत बालक हा पोलीस अभिलेखावरील असून यापुर्वी त्याचे विरूध्द उत्तमनगर पो.स्टे. व वारजेमाळवाडी पो.स्टे.ला वाहन चोरीचे १० गुन्हे, तसेच १ पोस्को, व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही सदरची कामगिरी Pune Police अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पुणे शहर निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पो. उपनिरीक्षक महेश कोकाटे तसेच पो.हवा. शरद वाकसे, सर्जिव कळंबे, केदार आढाव, गणेश सुतार, विनोद, जाधव, सोनम नेवसे, सुजित पवार पोलीस अंमलदार प्रतिक मोरे, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिदे, हरिश गायकवाड, राकेश टेकावडे, इसाक पठाण यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
06:40