क्राईम न्यूज
Trending

Pune BSF PSI Chain Snatching | सेवानिवृत्त बीएसएफ उपनिरीक्षकाच्या गळ्यातील चैन हिसकावली : पुण्यात सोनसाखळी चोरांचा उच्छाद

Pune BSF PSI Chain Snatching

  • लुल्ला नगर चौकातील घटना

पुणे, दि. ६ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर Pune BSF PSI Chain Snatching |

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी जाण्याच्या घटना पुणे शहरात दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोनसाखळी चोरांचे मोठे आव्हान पुणे पोलिसांसोमर उभे ठाकले आहे. सीसीटीव्ही असताना देखील चोरटे भीती बाळगत नसल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची चिन्हे आहेत. Pune BSF PSI Chain Snatching |

लुल्ला नगर चौकात नातवाला शाळेला पाठ्वण्यासाठी बसची वाट पाहत थांबणाऱ्या सेवानिवृत्त महिला बीएसएफ उपनिरीक्षकाच्या गळ्यातील चैन दोघा दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला या बीएसएफ उपनिरीक्षकापदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. ते दररोज आपल्या नातवाला डीपीएस स्कुल महमंदवाडी शाळेत पाठविण्यासाठी लुल्लानगर चौकात शाळकरी बसची वाट पाहत थांबत असतात. दि. ४ रोजी सकाळी ७ च्या दरम्यान व्ही एस होम स्टोर समोरील रास्ता ओलांडत असताना दुचाकी वरून आलेल्या दोघा चोरटयांनी गळ्यातील ३० ग्राम वजनाची चैन हिसकावली.

याबाबत वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. Pune BSF PSI Chain Snatching |

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0