Pune Bribe News : “साहेब हेलिकॉप्टर शॉट लावतील…,असे बोलून भूमी अभिलेखाच्या अधिकाऱ्यांची लाच रुपी खंडणीची मागणी

•उपअधीक्षक भूमीअभिलेख आणि भूमीकरमापक यांचा कारनामा लाचसाठी फिर्यादीला दमदाटी आणि धमकी!
पुणे :- पुण्याच्या भूमी अभिलेख विभाग हवेली येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भूमी अभिलेख उप अधीक्षक अमरसिंग रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण येटाळे यांनी फिर्यादी यांच्याकडे लाच रुपी खंडणी मागणीचे धक्कादायक बातमी समोर आली आहे. फिर्यादी कुणाल चंद्रशेखर अष्टेकर (41 वय रा. जंगली महाराज रोड शिवाजीनगर पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी भूमी उप अधीक्षक आणि भुकरमापक यांच्या विरोधात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल यांची हडपसर,येथील (सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 ) ची मिळकतीची सन 2023 व सन 2024 मध्ये भुमीअभिलेख कार्यालय, हवेली, पुणे यांचेकडुन शासकीय फी भरुन कायदेशीर रितसर पद्धतीने मोजणी करुन घेतली होती. परंतु सदर जागेच्या मोजणीनंतर हद्द निश्चिती करण्यासाठी जुन 2024 रोजी आरोपी अमरसिंह पाटील, (उप-अधीक्षक, भुमी अभिलेख, पुणे) भुकरमापक किरण येटाळे यांनी फिर्यादीकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर आरोपी किरण येटाळे याने सदर रकमेमध्ये सवलत देतो असे सांगुन 25 लाख रुपयांची मागणी करुन, रक्कम दिली नाही. तर अमरसिंह पाटील, (उप-अधीक्षक, भुमी अभिलेख, पुणे) हे हेलीकॉप्टर शॉट लावतील असे बोलुन मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी दिली होती.तसेच फिर्यादी कुणालवर पैसे देण्यासाठी दबाव टाकला.
फिर्यादी हे अमरसिंग पाटील यांनी मागितलेली रक्कम न दिल्याने, ते शासकीय नोकर असुन देखील त्यांनी फिर्यादीचे नुकसान करण्याचे उद्देशाने फिर्यादी यांचे जमिन लगतधारकांची चुकीची ‘क’ प्रत तयार करुन मोठे नुकसान केले होते. अशी माहिती सुहास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी दिली असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मच्छींद्र खाडे (सहा पो आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे पुणे शहर) करत आहे.



