Pune News : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाकडुन मोठी कारवाई
Pune Breaking News : राज्य उत्पादन शुल्क कडून मोठी कारवाई, अवैधरित्या साठा करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई
पुणे :- राज्य उत्पादन शुल्क (state excise duty) विभागाकडून अवैद्यरित्या दारू Illegals Alcohol साठा करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. Code Of Conduct आचारसंहिता लागल्यापासून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू साठा जप्त करण्यात आला आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई विजय सुर्यवंशी साहेब व संचालक, अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे तसेच विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election च्या पार्श्वभुमीवर पुणे जिल्हयामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून 16 मार्च 2024 ते 22 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये गुन्हा अन्वेषण संबंधित प्रभावी कारवाईची माहिती खालीलप्रमाणे दर्शविण्यात येत आहे. Pune Crime News
325 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे
हातभट्टी दारु (ब.लि) 15846.5
देशी मद्य (ब.लि) 755.53
विदेशी मद्य (ब.लि) 629.7
बिअर (ब.लि) 804.89
ताडी (ब.लि) 3954
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री तसेच परराज्यातील मद्य/अवैध वाचे/अवैध ताडी विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे अवैधरित्या पुरविण्यात येणाऱ्या मद्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्याकरिता राज्य उत्पादन शुल्क, पुणे या विभागाने एकुण 14 नियमित पथके व एकुण 03 विशेष पथके तयार केलेले असून अवैध मद्याची निर्मिती, वाहतुक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी रात्रीचे गस्त घालण्यात येऊन ठिक ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येवुन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचा महसुल चुकवुन परराज्यातुन येणाऱ्या मद्य साठयावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळेत चालु नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. Pune Crime News