Pune Breaking News : धक्कादायक बोगस जामीन प्रकरणी पुण्यात वकिलांची धरपकड !

Pune Police Latest Crime News : गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार टोळीचा पर्दाफाश, वानवडी पोलीसांची कामगिरी
पुणे :- बनावट कागदपत्रे आणि बोगस जामीनदार न्यायालयात सादर करून त्याआधारे आरोपींना जामिनावर सोडण्यास मदत करणारे रॅकेट पुण्यात सक्रिय असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासातून पुढे आली आहे. खोटी कागदपत्रे तयार करून बोगस जामीनदार यांच्याकडून अनेकदा न्यायालयाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी आता वानवडी पोलीस सखोल Wanwadi Police Latest News चौकशी करून या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या रॅकेटची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. जामीनदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार करून 6 जणांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात वानवडी पोलीसांनी आत्तापर्यंत 11 जणांना विरुद्ध गुन्हे दाखल केले. तर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्हा कोणता आहे व त्यातील आरोपींची आर्थिक व्यवहार करून पैसे घेत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.



कशाप्रकारे टोळी होती सक्रिय?
न्यायालयात येणाऱ्या गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हेरुन त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करत असत. त्यानंतर टोळी हे बनावट जामीनदार यांचे दुसऱ्याच नावाने आधारकार्ड, रेशनकार्ड व ऑनलाईन 7/12 वरील नावात बदल करुन ते कागदपत्रे तयार करत होते. रेशनकार्ड खरे वाटावे म्हणून त्यावर पुरवठा विभागाचे उपायुक्तांचे रबरी स्टॅम्प मारुन खोटी सही करीत होते. त्याद्वारे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करुन संबधित कोर्टातील सहाय्यक अधिक्षक (नाझर) यांचेकडून बनावट कागदपत्रे पडताळणी करुन खरे असल्याचे प्रमाणित करायचे.न्यायालयासमक्ष जामीनदारांना हजर केल्यावर वकील व बनावट जामीनदार हे खरे असल्याचा आव आणत आणि न्यायालयाची दिशाभुल करुन जेलमधील गुन्हेगारांना जामीन मिळवुन देत असत.
वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीसांना या बनावट जामीनदारांच्या रॅकेटबाबत गोपनिय माहिती मिळाली. त्याआधारे दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांचे दिलेल्या निर्देशावरून लष्कर कोर्ट आवारात सापळा लावण्यात आला. या सापळ्यामध्ये संतोषकुमार शंकर तेलंग याचेसह 5 बनावट जामीनदार ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याचा साथीदार व मुख्य आरोपी फरहान ऊर्फ बबलु शेख, (रा. वैदवाडी, हडपसर) हा गर्दीचा फायदा घेऊन पळुन गेला. वानवडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 319 (2), 318 (4), 338, 336(3), 340(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करुन सुरूवातीला 6 आरोपी अटक केली होती.
अटक आरोपीनकडून मिळालेल्या माहितीवरुन मुख्य आरोपी फरहान उर्फ बबुल शेख यास बनावट व चोरुन रबरी शिक्के तयार करुन देणारा दर्शन अशोक शहा, (वय 45, रा सोलापुर बाजार, कॅम्प, पुणे) यास अटक केली व त्याच्याकडुन एकुण 9 रबरी स्टॅम्प व मशिन जप्त केली आहे.
एकेरी पानाचे रेशनकार्ड प्राप्त करुन देणारे पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे, (वय 60 रा. भारतमाता चौक, मोशी, ता. हवेली) गोपाळ पुंडलीक कांगणे, (वय-35 रा.मोरवाडी), पिंपरी कोर्टाचे शेजारी, पिंपरी यांना अटक दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी केली. पोलिसांकडून या प्रकरणी मुख्य सूत्रधार ॲड अस्लम सय्यद, योगेश जाधव यांना अटक केली असून पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये 24 गुन्हेगारांना अशाप्रकारे जामीन मिळवून दिले आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 91 बनावट रेशन कार्ड, 11 आधार कार्ड जप्त केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी टाणे वानवडी पोलीस ठाणे हे करीत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 राजकुमार शिंदे यांनी दिले आहे.
पोलिसांकडून या प्रकरणी मुख्य सूत्रधार ॲड अस्लम सय्यद, योगेश जाधव यांना अटक केली असून पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये 24 गुन्हेगारांना अशाप्रकारे जामीन मिळवून दिले आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 91 बनावट रेशन कार्ड, 11 आधार कार्ड जप्त केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी टाणे वानवडी पोलीस ठाणे हे करीत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 राजकुमार शिंदे यांनी दिले आहे.