- आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या बीम लाईटचा वापर टाळा : पुणे पोलिसांचे आवाहन
पुणे, दि. ११ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Beam Light Cases
उत्सव साजरा करताना डीजे सोबत थिरकण्यासाठी बीम लाईटचा वापर करणाऱ्या मंडळावर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वाघोली परिसरात दहीहंडी साजरा करताना शार्पी लाईट, बिम लाईट लावणाऱ्या चार मंडळांवर केले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोणीकंद पोलिसांकडून मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या मंडळांच्या अध्यक्षांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. Pune Beam Light Cases
लोणीकंद पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दहीहंडी सणामध्ये काही मंडळांनी लेझर लाईट लावण्या मनाई आदेश असतानाही शार्पी लाईट, बिम लाईट लावून आदेशाचा भंग केलेल्या मंडळांच्या अध्यक्षांवर दि.10/09/24 रोजी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे 04 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील मुद्देमाल कायदेशीर पद्धतीने जप्त करून नमूद गुन्ह्यातील आरोपींना BNSS 135 (1) (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली.
दाखल केलेले गुन्हे खालील प्रमाणे
1) गु. रजि. नं – 839/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे
अध्यक्ष, शुभम सुभाष पवार, अमरदीप प्रतिष्ठान बायफ रोड वाघोली पुणे
2) गु. रजि. नं – 840/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे
अध्यक्ष, अविनाश काळुराम कुटे, गणेश बापू कुटे युवा मंच आवळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे
3) गु. रजि. नं. 841/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे
इसम नामे प्रितेश सतिष हरगुडे रा. केसनंद ता हवेली जि पुणे
4) गु. रजि. नं. 842/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे
अध्यक्ष महेंद्र परशुराम भाडळे वाघेश्वर तरुण मंडळ राहणार वाघोली पुणे
तसेच ध्वनी प्रदूषण चे स्वारगेट पोलीस स्टेशन येथे 08 गुन्हे, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे 12 गुन्हे व सहकार नगर पोलीस स्टेशन येथे ‘लेझर लाईटचा एक गुन्हअसे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.