Thane Crime News : अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात ; चोरी, घरफोडीचे 10 गुन्हे उघडकीस
Thane Crime Branch 5 News : नवी मुंबई, ठाणे या परिसरात चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष-5 जेरबंद केले
ठाणे :- ठाणे शहरात Thane City Crime मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हे शाखा घटक-5 वागळे इस्टेट, Thane Crime Branch यांनी सराईत चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींच्या विरोधात ठाणे, नवी मुंबई, वाशिंद पोलीस ठाण्यात Washind Police Station गुन्हे दाखल आहे. तसेच पोलिसांनी आरोपींच्या विरोधात असलेले 10 गुन्हे उघडकीस आणले आहे. Thane Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरबावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(4),62,3(5) प्रमाणे गुन्ह्याचा तपास,गुन्हे शाखा घटक-5 ठाणे यांच्याकडून सुरू असताना पोलीस हवालदार रावते यांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेच्या प्राप्त करून त्याद्वारे तीन आरोपींची ओळख पटवून आरोपी निष्पन्न केले. Thane Latest Crime News
तसेच गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा केल्यानंतर सातारा येथे गेल्याचे तांत्रिक तपासामध्ये दिसून आल्याचे आहे. पोलिसांनी सातारा येथील नागोठणे इथून तीनही आरोपींना अटक केली असून न्यायालय समोर हजर केले असता पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे. तसेच आरोपींच्या विरोधात एकूण दहा गुन्हे दाखल असून त्यामध्ये घरफोडी आणि वाहन चोरी यांसारख्या गुन्हे दाखल आहे.आरोपींनी कापूरबावडी, कासारवडवली, श्रीनगर , वाशिंद, शहापूर, रबाळे, नवी मुंबई येथे चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपींनी चोरी केलेल्या एकूण मुद्देमालापैकी 75 हजार 770 रुपये रोख रक्कम आणि तीन मोटरसायकल हस्तगत केले आहे. तसेच यातील दोन आरोपी यांच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी म्हणून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने हे करत आहे. Thane Latest Crime News
अटक आरोपींची नावे
- 1.अर्जुन चंदन मल्होत्रा, (25 वर्ष रा. वारली पाडा, श्रीनगर, ठाणे)
- 2.अदित्य अमोल सोंडकर,(20 वर्ष,रा. कांजुर मार्ग, मुंबई.)
- 3.निखिल प्रकाश माने, (19 वर्ष,रा. घाटी पाडा, वैशालीनगर, मुलुंड.)
अर्जुन चंदन मल्होत्रा याच्या विरुद्ध पाच गुन्हे दाखल आहे.अदित्य अमोल सोंडकर याच्याविरुद्ध तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 (गुन्हे) शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, पोलीस हवालदार सुनिल निकम, विजय काटकर, रोहीदास रावते, सुशांत पालांडे, अजय साबळे, पोलीस नाईक तेजस ठाणेकर,रघुनाथ गार्डे, पोलीस शिपाई यश यादव या पथकाने केली आहे.